Tuesday, 12 March 2013

पत्रकारांवरच भडकल्या जयाप्रदा


लखनौ- एकेकाळच्या प्रसिद्ध अभिनेत्री आणि विद्यमान खासदार जयाप्रदांनी मंगळवारी पत्रकारांशी वाद घालून आपल्या समोरील अडचणीत वाढ केली आहे. त्यांनी कॅमेरासमोरच पत्रकारांना थोबाडीत मारण्याची धमकी दिली. जयाप्रदा कुंडा येथे शहीद झालेले पोलिस अधिकारी जिया उल हक यांची विधवा पत्नी परवीन आझाद यांची भेट घेण्यासाठी देवरिया येथे आल्या होत्या. पत्रकारांनी त्यांना राज्यातील कायदा सुव्यवस्था आणि समाजवादी पक्षाच्या संबंधाबाबत प्रश्न विचारले होते.

त्या म्हणाल्या, अखिलेश यादव यांच्याशी माझे कुठलेही मतभेद नाहीत. ते मला भावासारखे आहेत. पण त्यापूर्वी ते मुख्यमंत्री आहेत. राज्याची कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे.

मात्र, सपाच्या एका प्रश्नावर जयाप्रदा पुरत्या भडकल्या. त्यांनी पत्रकारांना, ङ्कहा कसला प्रश्न आहे. मला पक्षातून काढण्यात आले आहे.ङ्क त्या इतक्यावरच थांबल्या नाहीत. त्यांनी पत्रकारांना उद्देशून, तुम्हाला बुद्धी आहे की नाही, असा उलट प्रश्न विचारून थोबाडीत मारण्याची धमकीच दिली.

रामपूरच्या खासदार असलेल्या जयाप्रदा आणि समाजवादी पक्षाचे माजी महासचिव अमरसिंग यांना २०१० साली पक्षातून काढण्यात आले होते. अमरसिंग आणि जयाप्रदा यांच्याबरोबर अशोक चंदेल, संदीप अग्रवाल, मदन चौहान आणि सर्वेश सिंग पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे काढून टाकण्यात आले होते.

No comments:

Post a Comment