Friday, 10 May 2013

कोकणचा समृद्ध समुद्री इतिहास



महाराष्टातील ठाणे आणि मुंबईच्या किनारपट्टीवरील जलवाहतूक आणि व्यापाराची हजारो वर्षपूर्वीची परंपरा आहे. ठाणे जिल्ह्याचा इतिहास आणि त्यातील प्रमुख घटना लक्षात घेतल्या तर, हजारो वर्षांची परंपरा आणि अनुभव असलेले आपल्या आगरी आणि कोळी बांधवांना इंग्रजांप्रमाणेच जर त्यांनी धाडस दाखविले असते, तर आशिया, आफ्रिका आणि जगातील अन्य देशांवर आक्रमण करून तेथे आपले साम्राज्य प्रस्थापित करता आले असते. असे झाले असते तर, कोलंबसाने भारताचा शोध घेण्यासाठी केलेला समुद्रप्रवास आणि त्यानंतर इंग्लंडमधील दर्यावर्दीने अमेरिकेवर प्रस्थापित केलेले वर्चस्व याऐवजी समुद्रमार्गाने जगाचा शोध घेणा-या बहाद्दर भारतीय नौसैनिकांनी ब्रिटनसकट अमेरिका गाठून जगारव आपले वर्चस्व आणि साम्राज्य प्रस्थापित केले असते. इतिहासाला जबरदस्त कलाटणी देणारी ही घटना घडू शकली नाही याचे कारण नौकानयन किंवा समुद्रभ्रमण हेच काही धर्मशास्त्रांच्या दृष्टीने निषिद्ध होते. त्याबरोबरच जो काही पराक्रम करायचा आणि युद्ध जिंकायची ती मोठ्या संख्येने मैदानीच असून त्यासाठी हत्ती, घोडे, रथ याचा वापर करून रामायण आणि महाभारत काळापासून लढाया खेळल्या गेल्या असल्या तरी, वानर सेनेने लंका जिंकल्याचा अपवाद सोडला तर, सागरी मार्गाने जावून विजय मिळविण्याच्या घटना दुर्मिळच म्हणाव्या लागतील.

अगदी पुराणाचा आढावा घ्यायचा झाला, तर त्रेतायुगात समुद्राच्या लाटा थेट पश्चिम किनारपट्टीवरील सह्याद्रीच्या रांगांना धडक देत असत. त्यानंतर भगवान परशुरामाने पाशुपतास्त्र सोडून समुद्र मागे हटवला आणि त्यामुळे जी भूमी निर्माण झाली ती म्हणजे सप्तकोकण. या कोकणभूमीच्या मर्यादा किनारपट्टीला समांतर असणाèया सह्याद्री पर्वताच्या महाराष्ट आणि गुजरात प्रांताच्या सरहद्दीवरच्या सिलबाली रांगेपासून थेट दक्षिणेकडचे शेवटचे टोक म्हणजे कर्नाटक आणि केरळ प्रदेशातील डोंगररांगांमधून जात शेवटी कन्याकुमारीला भरसमुद्रात असलेल्या ‘श्रीपाद शिला‘ या शेवटच्या उंचवट्यापर्यंत ही विस्तृत किनारपट्टी पसरली आहे. हा सर्व भाग कोकणभूमी म्हणूनच ओळखला जात असल्याने आपण संकुचित दृष्टीने वसई ते गोवा याच महाराष्टातील किनारपट्टीला कोकण म्हणून ओळखत असलो तरी, विशाल कोकणपट्टीच्या सीमा थेट कन्याकुमारीपर्यंत पोहोचत असल्यामुळे सध्या याच किनारपट्टीवरून धावणा-या कोकण रेल्वेचे नाव हे ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व ओळखून दिलेले आहे.

हा सर्व इतिहास विस्तारपूर्वक ठाणे जिल्ह्याची माहिती मिळवत असताना ठाणे संघसरिता या पुस्तकात पहिल्याच अध्यायात मल्हार कृष्ण गोखले यांनी दिला आहे. जरी या पुस्तकाचे महत्व ठाणे जिल्ह्यात संघकार्याचे प्रारंभ आणि विस्तार कसा झाला या दृष्टीने अत्यंत माहितीपूर्ण असले तरी, हा त्यामुळे ठाणे जिल्ह्यात नौकानयन आणि जलवाहतुकीच्या दृष्टीने किती प्रगती झाली होती, हे चित्र स्पष्ट होते. ३००० हजार वर्षांपूर्वी चालत आलेल्या या परंपरेचा वेध घेतला तर, शूर्पारक क्षेत्र म्हणजे आताचा ठाणे जिल्हा तसेच मुंबई आणि रायगड जिल्ह्याच मोठा भाग. त्यानंतर उत्तर कोकण किंवा कोकण-१४०० अशा आकड्याने त्याचे वर्णन केले जात असे. त्याचा अर्थ असा होता की इतक्या प्राचीन काळातसुद्धा या भागात १४०० गावे होती. त्यानंतरही शालीवाहन राजाच्या कारकिर्दित महाराष्टातील पैठण, तेहढोके, मालखेड, क-हाड आणि कोल्हापूर या सगळ्या व्यापारी पेठांमधून त्या काळात म्हणजे इ.स. ७८ म्हणजेच सुमारे २००० वर्षांपूर्वी कापूस, गूळ, मिरी, हस्तीदंत, तीळ, चंदन, चामडी असा माल अरबस्तान, इराण, पूर्व आफ्रिका, ग्रीस आणि रोमपर्यंत जात असे. त्याच देशातून भारतात तांबे, कथील, शिसे, जस्त, सोने आणि अरबी घोडे भारतात येत असत. सर्वांत महत्वाचे म्हणजे ही सगळी आयात-निर्यात गुजरातच्या समुद्रकिना-यावरील भडोच, नालासोपारा, ठाणे, रेवदंड्याजवळचे चऊल, कल्याण या बंदरांतून चालत असे. अगदी थेट कोल्हापूर किंवा पैठणपासून बैलांच्या तांड्याने हा माल बंदरावर यायचा आणि तेथून बोटीने तो भारताबाहेर पाठवला जात असे.
इ.स. ६३७ साली इस्लामची पहिली टोळधाड सिंध प्रांतावर नव्हे, तर उत्तर कोकणच्या ठाणे बंदरावर कोसळली होती. मात्र महत्वाचे म्हणजे महम्मद बीन कासिमने सिंधवर केलेल्या स्वारीनंतर तो भाग जिंकून दाहिर राजाला हरविले होते. मात्र ठाणे बंदरावर अरबांनी केलेले आक्रमण चालुक्य सम्राट सत्याश्रय पुलकेशी याने आपल्या प्रबळ आरमाराच्या जोरावर परतवून लावले होते. आपण इतिहास शिकत असताना हिंदू सैन्य आणि राजाने मार कुठे खाल्ला याचेच तपशील लक्षात ठेवतो. मात्र सध्याही प्राचीन भारतातील आपल्या नौदलाच्या पंरपरेचा अभिमान वाटावा अशी ही घटना आहे. इतकेच नव्हे तर त्यानंतर शिलाहार राजा यादव घराणे यांनी या भागात राज्य केले. त्या काळात इ.स. १२ किंवा १३ व्या शतकात पैठण, ठाणे आणि चऊल या शहरांतील कापडाचे उत्पादन जगभरात प्रसिद्ध असून त्या काळात केवळ ठाणे शहरात ५००० विणकर मखमलीचे कापड तयार करण्यात गुंतलेले असत. याच शिलाहार राजांपैकी राजा अनंतदेव याचा व्यापारक्षेत्रात असलेल्या भामणशेट्टींची व्यापारी गलबते सोपारा, ठाणे, चऊल आणि सध्याचे खारेपाठण या बंदरातून नौकांच्या द्वारे जगभर व्यापार करत असत. याच राजाने मुंबईतील वाळकेश्वर आणि महालक्ष्मी तसेच सध्या आंबरनाथचे प्रसिद्ध असलेले शिवमंदिर उभारले होते.

ही सर्व प्राचीन परंपरा आणि नौकानयनाचे महत्व लक्षात घेतले, तर केवळ ठाणे जिल्हाच नव्हे तर महाराष्टाच्या किनारपट्टीतील दर्यावर्दी समाज आणि राजकत्र्यांनी व्यापार आणि संरक्षण या दृष्टीने या क्षेत्रात निर्माण केलेले जागतिक दृष्टीने महत्वाचे स्थान लक्षात येते. सध्याच्या काळात हवामान, नौकानयन यासाठी अत्याधूनिक साधने, वायरलेस आणि संगणक नियंत्रित उपकरणे असली तरी, जलवाहतूक करण्यामध्ये अनेक अडचणी आहेत. मात्र ३००० वर्षांपूर्वीपासून ते थेट परंपरेने चालत आलेल्या कोकणपट्टीतील राजकत्र्यांचा इतिहास लक्षात घेतला, तर त्या काळात समुद्रमार्गाने केवळ पर्यटन किंवा संरक्षणच नव्हे तर जगातील अन्य देशांशी आपण करत असलेल्या आयात-निर्यातीद्वारे प्रस्थापित केलेले संबंध हे सर्व त्या काळात करण्यासाठी किती जिद्द, हिंमत आणि नौकानयन क्षेत्रतील प्राविण्य हे राज्यकर्ते आणि त्यांच्या आरमारांनी प्राप्त केले होते, याचा अंदाज येतो.

अगदी अलिकडच्या काळाचा विचार केला तरी, छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार आणि पेशवाईतील चिमाजी अप्पा याने कोकणपट्टीवरील अलिबाग, जंजिरा, वसई येथील किल्ले आणि समुद्रकिना-याचे संरक्षण करण्यासाठी उभारलेले आरमार हा पराक्रम अत्यंत प्रेरक आहे. १६५७ साली शिवाजी महाराजांनी कल्याण-भिवंडी जिकली आणि तेथे दुर्गाडी किल्ला बांधला. त्यानंतर १९७९ साली जंजिरेकर सिद्दी या समुद्री शत्रुचे आरमार मुंबईतील माझगाव बंदरात असल्याचा सुगावा शिवाजी महाराजांना लागल्यानंतर माझगाववर अचानक छापा घालून सिद्दीला पळविण्याचा बेत त्यांनी आखला. ही कामगिरी त्यांनी दौलतखान सरदारावर सोपविली. अर्थात त्या काळात मुंबई बंदराचे संरक्षण करणा-या ब्रिटिश अधिका-यांनी दोलतखानाला सिद्दीच्या आरमारावर आक्रमण करण्यासाठी परवानगी नाकारली. परंतु त्याच काळात ब्रिटिशांनी त्यावेळी ठाणे बंदरात ४० लढाऊ मचवे सज्ज ठेवले होते. अर्थात याच काळात प्रथम मुघल आणि नंतर फिरंग्यांचा धर्मप्रसारासाठी किनारपट्टीतील संचार हा पकार चालूच होता. त्यानंतर १७३७ मध्ये थोरले बाजीरावांचा धाकटा भाऊ चिमाजी अप्पा हा स्वत: वसईचा किल्ला जिंकायला निघाला आणि १७३९ च्या मे महिन्यांत चिमाजी अप्पांनी वसईचा किल्ला जिंकून घेतला.

हा सर्व थेट पुरातन काळापासून इंग्रजांच्या कारकिर्दिपर्यंत ख-या अर्थाने भारतीय आरमाराचा आणि ठाणे जिल्ह्याचा प्रेरक इतिहास ठरतो. त्या दृष्टीने पाहिले तर सध्याच्या काळात पर्याप्त आधूनिक साधने आणि ब्रिटिशांच्या राजवटीत युद्धनौका, ऑईल टँकर, सध्या कंटेनर वाहून नेणा-या ५० हजार टनापेक्षा जास्त मालवाहू बोटी ही सर्व प्रचंड प्रमाणावरील समुद्रमार्गे चालणारी जलवाहतूक लक्षात घेतली, तर खास भारतीय किंवा महाराष्ट आणि विशेषकरून आगरी आणि कोळी समाज यांचे या क्षेत्रातील योगदान आणि महत्व किती अपुरे आहे, हे लक्षात येते. त्यादृष्टीने पुन्हा एकदा आपली गौरवपूर्ण नौकानयनाची परंपरा आणि या किनारपट्टीचा एक अविभाज्य भाग असणा-या समुद्रातील नौकानयन आणि जलवाहतूक क्षेत्रात आपण प्रगती करू शकतो. मात्र त्या दृष्टीने शासन आणि समाज यांच्यामध्ये जबरदस्त जागृती आणि निर्धार निर्माण करण्याची आवश्यकता आहे.

- मिनल माळी

अतिरेक्यांची काटेकोर नजर, समाजाचे दुर्लक्ष !


माझे बालपण समुद्राच्या कुशीत गेले आहे. तो विशाल समुद्र... घोंघावत येणा-या उंचच उंच लाटा... तो गंभीर ध्वनी ऐकत ऐकतच माझे लहानपण गेले. आमच्या घरच्या परिसरात डोंगर आणि झाडी होती. 

अलिबागजवळील रेवस हे माझे गाव. लाँचमधून रेवस धक्क्यावर उतरली की येणारे पहिलेच गाव. गाव पहिले पण घर मात्र शेवटचे. आणि घराच्याच पाठीमागे भलामोठा समुद्र. तर या समुद्राकडे पाहतच मी लहानाची मोठी झाले. फिरायला समुद्रावर, खेळायला समुद्रावर.. समुद्र हेच आमच्या आगरी-कोळ्यांचे जीवन होते. लहानांसाठीसुद्धा आणि मोठ्यांसाठीही. आमच्या उपजिवीकेचे तेच प्रमुख साधन. समुद्रातील मासे पकडायचे आणि ते विकून जे पैसे येतील त्यातूनच दोन वेळेचं जेवायला मिळायचं.

माझ्या वडिलांनी तर स्वत:चे तसेच त्यांच्या छोट्या भावांचे शिक्षणदेखील मासे विकूनच पूर्ण केले, असे पप्पांच्या बोलण्यातून एक-दोनदा ऐकू आले होते. परंतु माझे शालेय जीवन आठवले की अजूनही मनात आनंदाच्या लाटा उसळतात. पहिलीत होती मी तेव्हा. आमच्या गावातच शाळा होती आणि शाळेच्या पाठीमागे एक भलेमोठे चिंचेचे झाड होते. तसे शाळेच्या बाहेर चिंचवाला असायचाच, पण झाडावरच्या ताज्या चिंचेचा स्वाद काही निराळाच. म्हणून मधल्या सुट्टीत आम्ही त्या चिंचेच्या झाडाजवळ जायचो. पण लहान असल्यामुळे मला झाडावर काय चढता यायचे नाही. त्यामुळे माझ्यापेक्षा वयाने व उंचीने मोठी असलेली मुले झाडावर चढली की, जसा कोल्हा कावळ्याच्या तोंडातील माशाच्या तुकड्याकडे टक लावून बघत असतो तसेच आम्हीही त्यांच्याकडे बघत असायचो. ‘ए दादा, एक चिंच दे ना‘ म्हणत. कधी मिळायची, तर कधी... असो...

दिवसभराच्या या छोट्या-मोठ्या कार्यक्रमात असलो तरी कधी एकदा खेळायला समुद्रावर जायला मिळेल, असे वाटे. रोज संध्याकाळी मी खेळायला समुद्रावर जायचे. तसा आमच्या घरातूनही समुद्र दिसायचा, पण जोपर्यंत त्याच्या कुशीत जावून त्याच्या लाटांसोबत मनसोक्त खेळायला मिळत नव्हते, तोपर्यंत मनाला समाधान मिळायचे नाही. मात्र तेव्हाच समुद्रकिना-याच्या पलिकडील मुंबईतील उंचच उंच इमारती दिसायच्या. त्यावेळी एकच स्वप्न होते, आपणही एक दिवस मुंबईला जावू. दुरूनच या मायावी नगरीचे दर्शन घेत असताना त्या समृद्ध मुंबईत कधी राहायला मिळेल. हाच विचार मनात घेवून मी घरी परतायचे. अनेक वर्षे लोटली आणि एक दिवस उजाडला तो मला मुंबईला घेवून जाण्यासाठीच !

माझ्या वडिलांना मुंबईत नोकरी लागली होती. आम्हाला सर्वांना घेवून ते मुंबईला जाणार होते. मी खूप आनंदात होती. रोज दुरवरून न्याहाळणाèया मुंबईचे अखेर मला जवळून दर्शन घडले. त्यानंतर माझे पुढील शिक्षण मुंबईतच पूर्ण झाले. आज गेली १५ वर्षे मी मुंबईत राहत आहे. परंतु गावाबद्दल वाटणारी ती ओढ अजूनही संपलेली नाही. म्हणून प्रत्येक सुट्टीत आजही आम्ही सगळे लाँचमध्ये बसून गावी जातो. गावातून मुंबई दिसायची. पण मुंबईतून कधीच मला माझे गाव दिसले नाही. आज मला त्या ‘संध्याकाळ‘ची आठवण येते, जेव्हा मी रोज समुद्रावर खेळायला जायचे. पण मुंबईच्या या व्यस्त जीवनशैलीत गुरफटले गेल्यावर जवळ असूनही आता कसला समुद्र आणि कसलं काय... एक मात्र चांगलं आहे. आज जेव्हा पण मला मुंबईतून माझ्या गावी जावेसे वाटते, तेव्हा मी लाँचमधून सहज जावू शकते. ते अस्तित्वात असलेल्या सागरी मार्गामुळेच. तो म्हणजे भाऊचा धक्का ते रेवस...

मात्र आता मुंबईतील गर्दी, प्रचंड वाहतूक आणि अत्यंत कष्टदायक धावपळीचे जीवनाचा अनुभव घेत असताना, आपल्या गावी जाण्याची उत्कंठा लागते. मात्र येथील परिवहन चक्रात रोज फेरे मारताना मुंबईत आणि एकूणच महाराष्टड्ढात रस्तेवाहतूक, रेल्वे वाहतूक, विमान वाहतूक या सर्वच वाहतुकीच्या साधनांच्या विकासाच्या प्रमाणात जलवाहतुकीचे नगण्य आहे हे जाणवते. खरे तर मुंबई शहराला तिन्ही बाजूंनी समुद्रकिना-याने वेढले आहे. जवळच्या ठाणे  शहरालाही पश्चिम किनारपट्टीवरील वसई, विरार, डहाणू, नालासोपारा या भागांतून जलमार्गाने प्रवास करणे शक्य आहे. तसेच ठाण्यापासून वाशी, बेलापूरपट्टीतून थेट गेट वे ऑफ इंडिया किंवा मुंबईच्या भाऊच्या धक्क्यापर्यंत जलवाहतूक करणे शक्य असले तरी एकेकाळी शिडावरून चालणा-या गलबतातून ठाण्याच्या मीठबंदरापर्यंत मोठ्या प्रमाणावर भर समुद्रातून मासेमारी करण्यासाठी जाणा-या बोटी येत असल्या तरी, सध्या ही वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे.

एका गोष्टीचे वैषम्य वाटते, कोलकात्यामध्ये मुख्य स्टेशन हावडा येथून खाली पाय-या उतरल्या की जगातील अभियांत्रिकी क्षेत्रतील एक भव्य वास्तू म्हणून हुगळी नदीवरील प्रख्यात पोलादी हावडा ब्रीज समोर दिसतो. मात्र या पुलावरून कोलकाता शहराच्या मुख्य भागात जायचे तर प्रचंड गर्दी आणि वाहतुकीच्या कोंडीमुळे तासभर लागतो. त्याऐवजी कोलकातातील प्रवासी स्टेशनच्या पाय-या उतरून भराभर नदीकिनारी असणा-या हुगळी नदीतील उभ्या असणा-या बोटीत चढतात आणि १०-१५ मिनिटांतच पलिकडील किना-यावर मोठ्या संख्येने प्रवास करत असतात. तसेच गोव्यात पणजी ते म्हापसा आणि केरळमधील अनेक ठिकाणी जलवाहतूक मोठ्या प्रमाणावर चालते.

आज महाराष्टड्ढ सरकार हजारो कोटी रूपयांचे पूल, उड्डाणपूल, मेटड्ढो, मोनोचे पकल्प उभारत आहे.  विमानतळासाठी १० हजार कोटी रूपये खर्च येणार आहे. मुंबई शहरातच ५५ उड्डाणपूल तसेच समुद्रावरील वरळी ते वांद्रे या पुलाचे काम पूर्ण झाल्यावर आता शिवडी ते न्हावाशेवा यादरम्यान २२ किमी लांबीचा भरसमुद्रातून जाणारा भारतातील पहिलाच लांब अंतर असणारा पूल उभारण्याची सिद्धता झाली असून त्यासाठी पर्यावरण आणि अन्य अडचणी दूर केल्या गेल्या असून त्या पुलाच्या बांधकामासाठी आता टेंडरही मागवले गेले आहे.

सुमारे ४५ ते ५० हजार कोटी रूपये खर्चाचे हे परिवहन क्षेत्रतील महापकल्प मुंबईच्या परिसरातच उभारले जात असताना, अवघ्या ५०० कोटी रूपयांच्या खर्चात मुंबई ते मोरा, रेवस यासाठी आधूनिक जलवाहतुकीचा विचारही केला जात नाही. मला पावसाळ्यात माझ्या गावाला जायचे असेल, तर प्रचंड गर्दी व वाहतूक कोंडी असणा-या मुंबई शहरातून चेंबूर, मानखुर्द, वाशी, जुईनगर, बेलापूर, करंबोळी, पनवेल अशा मार्गाने ठाणे आणि रायगड जिल्ह्याला वळसा घालून गेल्यावरच पोहोचता येते. वास्तविक आधूनिक तंत्रज्ञान जलवाहतुकीतील वेगवान बोटी, उपग्रह दळणवळण यंत्रणा या सर्वांचा उपयोग करून या भागात जलवाहतुकीचा भक्कम पाया घातला गेला, तर माझ्याखेरीज या भागातील आगरी आणि कोळी बांधव यांची उपजिवीका आणि भवितव्याच्या दृष्टीनेही ते शासनाचे एक आवश्यक कर्तव्य ठरेल.

- मिनल माळी

पोषक आहाराचे काही दुष्परिणाम


अनेक वेळा योग्य माहितीच्या अभावी बरेचशे खाद्यपदार्थ हितकारक आहेत, असे समजून आहारात वापरले जातात, पण हे योग्य नाही. अशा प्रकारामुळे शरीरासाठी धोका वाढू शकतो. हा धोका टाळण्यासाठी आहार घेताना आहारतज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

लसूण
यात असणारे अँटीऑक्सिडंट तत्त्व प्रतिकार क्षमतेला सक्षम करतात. ज्यामुळे सर्दी-पडशापासून बचाव केला जातो, परंतु ज्या लोकांना जास्त घाम येत असतो त्यांनी जास्त लसूण खाणे टाळले पाहिजे. अशा लोकांनी आहारात दिवसात एक-दोन लसूण पाकळ्या पुरेशा ठरतात. याच्या अधिक वापराने पोटात जळजळ होण्याचा त्रास होतो.

केळी
हे पोटॅशियमचा चांगला स्रोत असणारे फळ आहे. आहारात जास्त प्रमाणात असणार्या मीठामुळे शरीरात तयार झालेल्या सेलिन(मीठ)वर नियंत्रण ठेवण्यात याची महत्त्वाची भूमिका असते, पण जे लोक कमी प्रमाणात मीठ खातात पण केळे जास्त खातात, त्याची चयापचय प्रणाली बिघडते.

कोबी
कोबी, फ्लॉवर जास्त खाण्याचा सल्ला दिला जातो, परंतु यात असणारे गॉइटड्ढॉजेंस नावाचे तत्त्व थायरॉइड हार्मोन्सच्या कार्यप्रणालीला हानी पोहोचवतात. याच्यामुळे हायपोथाइरॉइडिज्मची शक्यता वाढते. याच थायरॉइड ग्रंथीत पुरेशा प्रमाणात हार्मोन्स निर्मिती थंडावल्याने लठ्ठपणा वाढण्याची शक्यता वाढते.

टोमॅटो
सॅलड किंवा आहारात टोमॅटोचा मोठया प्रमाणात वापर केला जातो. रक्त शुद्धीकरणासाठी टोमॅटो उपयुक्त ठरतो, पण ज्यांना मुतखड्याचा त्रास आहे अशा लोकांनी टोमॅटो खाण्याचे टाळले पाहिजे. कारण याच्यामुळे शरीरात ऑक्सलेटचा स्तर वाढू लागतो आणि पीडित व्यक्तीला पुन्हा मुतखडा होण्याची शक्यता वाढते.

गाजर
पाण्याची पातळी कायम राहते रू गाजराचा रस पिल्याने शरीरातील पाण्याची कमतरता कमी होते. उन्हाळ्याच्या दिवसांत शारीरिक त्रास कमी करण्यासाठी हा रस उपयुक्त ठरतो.

प्रशांत दामलेंना हृदयविकाराचा झटका


मुंबई, दि. 10 मे – मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता प्रशांत दामले यांना शुक्रवारी हृदयविकाराचा झटका आला. हा झटका सौम्य स्वरूपाचा असला तरी अंधेरीतील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असली तरी डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यांचे एका लग्नाची गोष्ट या नाटकाचे प्रयोग पुन्हा सुरू करण्यात आले होते. परंतु तब्येतीमुळे पुढील 15 दिवसांचे सर्व नाटकांचे प्रयोग रद्द करण्यात आले आहेत.

भोपळ्याची खीर


साहित्य- पाव किलो लाल भोपळा, १ लिटर दूध, १ चमचा तूप, १/२ चमचे कणिक, साखर अंदाजे किंवा आवडीप्रमाणे, काजू, बदाम, पिस्ते यांचे काप, वेलची पावडर, केशर.

कृती- प्रथम भोपळा किसून घेणे, त्याला १ ते २ चमचे कणिक लावून प्रेशर कुकरमध्ये ३ शिट्टया काढणे, थंड झाल्यावर त्यात दूध घालून गॅसवर ठेवणे, साखर घालणे, वेलची पावडर घालणे, भोपळा लालसर असल्यास केशर घालायची गरज नाही. खीर उकळी येईपर्यंत ढवळत राहणे, खाली लागता कामा नये. आवडीप्रमाणे काजू, बदाम व पिस्ते काप घालणे, बेदाणे घालणे, चवीला खूप छान लागते.

सौंदर्यप्रसाधनांनी वाढतो मधुमेहाचा धोका


सौंदर्यप्रसाधनांचा वापर केल्याशिवाय अलीकडे महिला तर सोडा, पण पुरुषांचेही पान हालत नाही.

सौंदर्यप्रसाधनांचा अतिवापर करण्यांसाठी मात्र आता एक वाईट बातमी आहे. या सौंदर्यप्रसाधनांमध्ये असलेल्या काही खास प्रकारच्या रासायनिक घटकांमुळे मधुमेह होण्याचा दोका अनके पाटींनी वाढतो, असे एका नव्या संशोधनातील निष्कर्षातून समोर आले आहे ज्या महिला सौंदर्यप्रसाधनांचा अधिक वापर करतात, त्यांना मधुमेह होण्याची जास्त भीती असते.

या शोधानुसार, नेल पॉलिश, हेअर स्प्रे, साबण आणि शाम्पूसारख्या अनेक उत्पादनांमध्ये पॅथलेट्‍स नामक एक रसायन आढळते. हेच रसायन मधुमेहासाठी कारणीभूत ठरते. पॅथलेट्‍स आणि इंसूलिन प्रतिरोधकादरम्यान एक संबंध असल्याचे शोधातून आढळून आले आहे. पॅथलेट्‍स शरीराच्या इं‍सूलिन प्रतिरोधक क्षमतेला प्रभावित करतो. पॅथलेट्‍स शरीरातील शर्करेचे पचन करण्याचे कार्य बाधित करतो.

सेंटर ऑफ डिसीज कंटड्ढोल अ‍ॅन्ड प्रीव्हेंशन द्वारा आयोजित नॅशनल हेल्थ अ‍ॅन्ड न्यूटिड्ढशियन नामक शोधाअंतर्गत वर्ष २००१ ते वर्ष २००८ दरम्यान दोन हजारांपेक्षाही अधिक महिलांकडून प्राप्त माहितीचे विश्लेषण करण्यात आले. या ‍महिला २० ते ८० वयोगटांतील होत्या व त्यांच्या मुत्राचे नमुने घेण्यात आले होते.

शोधकत्र्यांनी सांगितले की, ज्या नमुन्यांमध्ये मोनो बेन्झायल पॅथलेट्स व मोनो आयासोबायटल पॅथलेट्‍स हे दोन्ही रसायन आढळून आले, त्यांना मधुमेह होण्याची शक्यता दुप्पट होती, तर ज्या महिल्यांमध्ये मोनो बायटल पॅथलेट्‍स व डाय-२ एथिलहायक्झाईल पॅथलेट्सचे प्रमाण आढळून आले, त्यांना मधुमेह होण्याचा धोका ७० टक्क्यांनी वाढला होता. ज्या महिला सौंदर्यप्रसाधनांचा वापर कमी करीत होत्या, त्यांच्या शरीरात हे रसायन एवढ्या प्रमाणात आढळून आले नाही. पॅतलेट्सची पातळी वाढविण्यासाठी स्थूलता हे देखील एक महत्वाचे कारण असल्याचे अभ्यासात आढळून आले आहे.

बर्गर


साहित्य- बटाटे, गाजर, हिरवा वाटाणा, बर्गर बन, कॉर्नफ्लॉवर, ब्रेड क्रम्स, तेल, गाजर, कांदा, चीज स्लाईस, टोमॅटो सॉस, आमचूर पावडर.

कृती- प्रथम बटाटे उकडून घ्यावेत. त्याचप्रमाणे गाजर आणि मटारही उकडून घ्यावा. बटाटे कुस्करून घ्यावेत आणि त्यात कॉनफ्लॉवर, आमचूर पावडर, मीठ, मटार, गाजर आणि ब्रेड क्रम्स घालावे. या सर्व मिश्रणाचे गोल गोळे करून घ्यावेत. आणि हे गोळे डीप फ्राय करून घ्यावेत. बर्गर बनवर केचअप लावून घ्यावा आणि त्यावर काकडी आणि कांद्याच्या चकत्या लावाव्यात. त्यानंतर बटाटयाच्या स्लाईसही त्यावर ठेवाव्यात. त्यानंतर चीज स्लाईस ठेवून. डीप फ्राय केलेले गोळा त्यात घालावा. हा घरगुती बर्गर खाण्यास तयार.

फणस चाट


साहित्य- फणसाच्या बिया १ पाव, तिखट, मीठ आवडीनुसार, जिरेपुड (भाजलेली) १ चमचा, वाटलेली हिरवी मिरची १ चमचा, आमचूर पावडर १ चमचा, साखर पाव चमचा, तेल किंवा तूप अंदाजे, जिरे अर्धा चमचा.

कृती- फणसाच्या बिया उकडून तीन शिट्या काढून उकडून घ्या. थंड झाल्यावर सोलून घ्या व मधोमध कापून (दोन भाग) घ्या. तेलावर लालसर रंगावर तळून काढा. थोड्या तेलावर जिरं व वाटलेले मिरची परता, एका भांड्यामध्ये तिखट, मीठ, आमचूर पावडर, थोडी साखर, भाजलेली जिरे पुड एकत्र करा. थोडं मीठ व तयार केलेला मसाला घाला व चाट सव्र्ह करा.

नूडल्स धिरडे


साहित्य - १ कप उकडलेली नूडल्स, दीड कप मैदा, एक लहान चमचा मीठ, अर्धा चमचा काळेमिरे पूड, दोन चीज क्यूब्स, तळण्यासाठी तेल, दूध आवश्यकतेनुसार, सुक्या लाल मिरच्या.

कृती - सर्वप्रथम मिक्सरमध्ये मैदा, मीठ व काळे मिरे पूड घालून नंतर त्यात दूध घालून मिश्रणाला एकजीव करावे. आता नॉनस्टिक पॅन गरम करून त्यावर थोडेसे उकडलेले नूडल्स ठेवावे त्यावर एक चमचा तयार मिश्रण घालून चांगले पसरवून घ्यावे. वरून चीज व लाल मिरच्याचे तुकडे घालून गुलाबी होईस्तोर दोन्ही बाजून परतून घ्यावे. सव्र्ह करताना सॉस व चटणी घालून सव्र्ह करावे.

शाही थालीपीठ



भाजणी पीठ धान्यांचे प्रमाण ज्वारी १ किलो, बाजरी १ध्२ किलो, मुग डाळ २५० ग्रॅम, उडीदडाळ २५० ग्रॅम, चणाडाळ २५० ग्रॅम, अख्खी चवळी २५० ग्रॅम, मटकी२५० ग्रॅम, तांदुळ २५० ग्रॅम, गहु २५० ग्रॅम, साल काढलेले सोयाबिन २५० ग्रॅम. धणे १०० ग्रॅम. जिरे २५ ग्रॅम. १च.चमचा मीरीचे दाणे. सर्व धान्येध्पदार्थ वेगवेगळे खरपुस भाजुन व एकत्र करुन बारिक दळावेत.

लागणारे पदार्थ - गाजर, शिमला मिरची, टोमॅटो, हिरवी मिरची,लसुण पात किवा ५-६ लसुण पाकळया, कोथिंबीर, पुदिना, आले तुकडा, कांदा, लाल मिरची पुड, हळ्दी पुड, ७-८ बदाम, ७-८ काजु, सफेत तीळ, भाजणीपीठ, पाणी.

कृती - एक गाजर,एक शिमला मिरची, एक टोमॅटो, दोन हिरव्या मिरच्या ,४-५ लसुण पाती किवा ५-६ लसुण पाकळया, अर्धी वाटी पुदिना,अर्धा इंच आले तुकडा,१ च.चमचा लाल मिरची पुड,अर्धा च.चमचा हळ्दी पुड, १ च.चमचा धणे जिरे पुड, १च.चमचा ओवा, ७-८ बदाम,७-८ काजु, चविपुरते मीठ ,एक वाटी दही.असल्यास चिमुट्भर केशर.

भाजांचे बारीक तुकडे करुन मिक्सर मध्ये टाकुन प्युरे करावी.त्यात कोथिंबीर व कांदा सोडुन वरिल सर्व जिन्नस मिसळून पेस्ट करावि व ती एका पातेल्यात किवा बाउल मध्ये ओतावी.त्यात बसेल तेवडे भाजणीचे पीठ कालवुन थोडेसे पाणी ओतुन पातळ्सर मळावे. मळवलेल्या पीठात वाटीभर बारीक चिरलेलि कोथिंबीर , एक बारिक चिरलेला कांदा व एक चमचा गोडे तेल टाकून पीठ चांगले मळुन घ्यावे. लगेच ओल्या फडक्यावर गोल आकारात थालीपीठ थापुन त्यावार चिमुटभर पांढरे तीळ शिंपडुन थालीपीठाला मध्यावर व बाजुला बोटाने ५-६ आरपार छिद्र करुन तापलेल्या जाड तव्यावर टाकावे व छिद्रांमधे थेंब थेंब तुप टाकुन व झाकण ठेउन थालीपीठ दोन्ही बाजुने खरपुस भाजावे.

टोमॅटो सॉस किवा दह्याबरोबर गरमागरम शाही थालीपीठ खावे.

संजय दत्तला होणार तुरूंगवास , सर्वोच्च न्यायालयाचा दणका

नवी दिल्ली, दि. 10 मे – अभिनेता संजय दत्तच्या शिक्षेवर फेरविचार करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली असून आता 15 मे रोजी त्याला तुरूंगात जावे लागणार आहे.


दरम्यान, 1993 च्‍या बॉम्‍बस्‍फोट प्रकरणी संजय दत्तला अवैध शस्‍त्र बाळगल्‍याच्‍या आरोपात दोषी ठरवून 6 वर्षे तुरुंगात शिक्षा सुनावण्‍यात आली होती. सर्वोच्‍च न्‍यायालयाने संजय दत्तच्‍या शिक्षेतील 1 वर्ष याआधीच कमी केले होते. त्यापैकी त्याने दीड वर्षे यापूर्वी तुरुंगात घालविली आहेत. उरलेल्या साडेतीन वर्षांच्या शिक्षेवर फेरविचार करण्यासाठी त्याने विनंती याचिका दाखल केली होती. परंतु ती शुक्रवारी फेटाळण्‍यात आली. त्‍यामुळे त्‍याला आता उर्वरित साडेतीन वर्षांची शिक्षा भोगावीच लागणार आहे. सर्वोच्‍च न्‍यायालयाने संजय दत्तला शरण येण्‍यासाठी मुदतवाढ दिली असून त्‍याला आता 15 मे रोजी शरण यावे लागणार आहे.

Wednesday, 8 May 2013

बाळंतपणानंतर अशा पद्धतीने घ्या आहार


महिलांनी बाळंतपणानंतर जेवणात पथ्य पाळावीत असा सल्ला दिला जातो, जेणेकरून शारीरिक अशक्तपणा दूर करण्यास मदत होते. बाळंतपणानंतर महिलांच्या शरीराला अनेक पोषक द्रव्यांची गरज असते. अशावेळी अनेक खाद्यपदार्थांचे प्रमाण वाढवावे लागते आणि काही खाद्यपदार्थांपासून दूर राहावे लागते.

असा असावा नाश्ता - सकाळच्या वेळी ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित राखण्यासाठी महिलांनी नाश्त्यात काबरेहायडड्ढेट (ब्रेड, सिरियल्स आणि दूध) चे सेवन र्मयादित प्रमाणात करावे आणि प्रथिनांचे (चीज, पीनट बटर आणि सुका मेवा) सेवन अधिक करावे. तसेच दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात डाळ भाज्या, भाकरी आणि कमी मसाले असलेल्या भाज्या खाल्ल्या पाहिजे.

लोहाची अधिक गरज - अनेक महिलांच्या शरीरातील रक्त बाळंतपणानंतर कमी होते. त्यामुळे डॉक्टर्स आयरन सप्लिमेंट्स प्रिस्क्राइब करतात. अशावेळी भरपूर ‘कङ्क जीवनसत्त्व असलेल्या टोमॅटो, बेक्ड बटाटे आणि सर्व प्रकारच्या आंबट फळांचे सेवन केले पाहिजे. जेणेकरून सप्लिमेंट्सचा अधिकाधिक फायदा मिळू शकेल.

हे लक्षात ठेवा - बाळंतपणानंतर बहुतांश महिलांना मलावरोधाचा त्रास होतो. त्यामुळे पेय पदार्थांचे भरपूर सेवन करावे. अशावेळी भरपूर फायबर असलेल्या खाद्य पदार्थांचेदेखील जास्त सेवन केले पाहिजे. उदा. सर्व प्रकारच्या धान्यापासून तयार करण्यात आलेले पदार्थ आणि भाज्या.

बाळंतपणानंतर काही महिने जेवणात ओव्याचा वापर करावा कारण ओव्यामध्ये थायमेल नावाचा अँटिऑक्सिडंट असतो. यामुळे शरीराची स्वच्छताही होते. ओव्याचे पाणीदेखील प्यावे.

या गोष्टींकडे लक्ष दिल्यास चेर्हयावर सुरकुत्या पडणार नाहीत


वाढत्या वयासोबत चेर्हयावर सुरकुत्या येतात, परंतु कधीकधी अवेळी सुरकुत्या येण्याची शक्यता असते. त्वचेची तन्यता कायम राहण्यासाठी कोलेजन हा घटक महत्त्वाचा असतो. याच्या कमतरतेमुळे शरीरावर सुरकुत्या पडायला लागतात. कोलेजन हा त्वचेबरोबर हाडे, स्नायू, कार्टिलेज आणि अंतर्गत अंग, दात या ऊतींना मजबूत करण्यासाठी गरजेचा असतो.

काय आहे कोलेजन ?
कोलेजन एक प्रकारचे प्रोटीन आहे. जे त्वचेच्या तीन स्तरांपैकी सर्वात खालच्या स्तरात आढळतो. हे अणूंप्रमाणे एकमेकांत गुंफून राहत पूर्ण त्वचेवर पसरलेले असतात. कोलेजननिर्मिती फाइब्रोब्लास्ट नावाच्या पेशीपासून होते. जे त्वचेच्या आतल्या डर्मिस पातळीवर असते. हा रक्तवाहिका, पाचनतंत्र, हृदय, जठर, मूत्रपिंड आणि आतड्यांना आपल्या जागेवर राहण्यासाठी मदत करणारा घटक आहे.

व्हिटॅमिन ‘सीङ्क गरजेचे
कोलेजनला नैसर्गिकरीत्या सक्षम ठेवण्यासाठी आणि फ्री रेडिकल्समुळे होणारे त्वचेचे नुकसान टाळण्यासाठी व्हिटॅमिन सी फार गरजेचे आहे. याच्या कमतरतेमुळे त्वचा कोलेजननिर्मिती करणे थांबवते. कोलेजनचा स्तर टिकवण्यासाठी सर्व आंबट फळे आणि पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत.

जास्त वेळ उन्हात राहणे, शरीरात फ्री रॅडिकल्सची निर्मिती होणे आणि दूषित वातावरणातील विषारी घटकांमुळे

कोलेजनचे नुकसान होते.
फॅटयुक्त खाद्यपदार्थांचे अतिसेवन आणि धूम्रपान, दारू अशा वाईट सवयींमुळे कोलेजनला धोका पोहोचतो.  आर्थरायटिससारखे आजार किंवा त्वचा संक्रमणामुळेही कोलेजन तुटण्याची प्रक्रिया सुरू होते.
तीव्र आगीच्या संपर्कात आल्यामुळेदेखील कोलेजनला हानी पोहोचते.

उशिरा प्रसूतीने होणार्या आरोग्य समस्या


करिअरला प्राधान्य किंवा इतर कारणांमुळे जेव्हा महिलांना वेळाने गर्भधारणा होते. तेव्हा त्यांना काही आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागते. वयाच्या ४० व्या वर्षांच्या दरम्यान गर्भधारणा होणार्या महिलांना तसेच नवजात शिशुला सुद्धा धोका वाढतो.

जास्त कालावधी
२० ते २५ वर्षे वयोगटातील महिलांच्या तुलनेत ३५ पेक्षा जास्त वयाच्या महिलांना गर्भधारणा करताना अनेक समस्या होऊ शकतात. तज्ज्ञांनुसार ३५ वर्षांनंतर महिलांमध्ये गर्भधारणेची शक्यता २० टक्क्यांनी कमी होते. अमेरिकन सोसायटी फॉर रिप्रोडक्टिव्ह मेडिसिननुसार ज्या महिलांना या वयात मासिक समस्येत अनियमितता जाणवते त्यांनी वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार करणे हिताचे ठरेल.

अधिक गुंतागुंती
जास्त वयामध्ये गर्भधारण झाल्याने महिलांना अनेक गुंतागुंतीच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तज्ज्ञानुसार अशावेळी प्लेसेंटा प्रेव्हीया ही समस्या उद्भवू शकते. या स्थितीत प्लेसेंटा आपल्या जागेपासून थोडेसे खाली येते. ज्यामुळे रक्तस्राव होण्याचा धोका वाढतो.

इतर समस्या
गेस्टेशनल डायबिटीज आणि उच्च रक्तदाब सारख्या समस्यांचा धोका जास्त वयाच्या गर्भवतींना अधिक प्रमाणात असतो. कुटुंबात या आजाराचा काही पूर्व इतिहास असल्यास त्याची माहिती डॉक्टरांना द्यावी. वयस्क गर्भवतींनी गर्भावस्थेत योग्य काळजी न घेतल्यास गर्भवती आणि शिशू दोघांनाही धोका वाढतो.

जुळे किंवा तिळे
जास्त वयात फर्टिलिटी कमी झाल्याने ओव्युलेशन इंडक्शनची मदत घेतल्यास जुळे किंवा तिळे होण्याची शक्यता वाढते. एवढेच नाही तर अशाने वेळेआधी प्रसूती होणे किंवा कमकुवत बालक जन्माला येण्याचा सुद्धा धोका असतो.

केसांच्या पोषणासाठी निवडा योग्य तेल


केसांच्या पोषणासाठी तेल फार महत्त्वाचे असते, पण तेल निवडताना केसाचा प्रकार लक्षात घेतला पाहिजे. केसांच्या प्रकारानुसार त्यांची विटामिन्स आणि खनिज तत्त्वाची गरज बदलत असते. प्रत्येक केसांची गरज वेगवेगळी असते. यासाठी आपल्या केसांना कोणते तेल योग्य आहे हे पाहणे फायद्याचे ठरेल.

सरळ लांब केस : आलमंड ऑइल
ज्या व्यक्तींचे केस सरळ आणि लांब असतात त्यांनी आलमंड ऑइल लावले पाहिजे. हा विटामिन ए,बी,सी आणि ईचा चांगला स्रोत आहे. हे विटामिन दुतोंडी केसांची समस्या कमी करून कोरडेपणा कमी करतो. या तेलामुळे केसांची चमक वाढवण्यास मदत होते. यात असणारे फॅटी अँसिड अल्टा व्हायलेट किरणांपासून केसाचे रक्षण करतात.

विरळ केस : रोजमेरी तेल
ज्यांचे केस विरळ असतात अशांसाठी रोजमेरीचे तेल फायदेशीर ठरते. याच्यामुळे हेअर फोलिकल्समध्ये वाढ होते. केस दाट होण्यासाठी हेअर फोलिकल्स महत्त्वाचे असतात. या तेलात लोह, कॅल्शियम आणि विटामिन बी सारखे पोषक तत्त्व असतात. हे तेल अँटी एंजिग एजंट म्हणून काम करत असते. याच्यामुळे केसांचा रंग आकर्षक होतो तसेच केसात चमक येत केस गळण्याचे प्रमाण कमी होते.

दाट केस : ऑलिव्ह ऑइल
ज्यांचे केस दाट असतात त्यांना डीप कंडिशनिंग करण्याची गरज असते. अशा स्थितीत ऑलिव्ह आइल जास्त फायदेशीर ठरते. या तेलात मोनोसॅच्युरेटेड फॅट असते याच्यामुळे केसांचा रूक्षपणा कमी होतो. त्याचप्रमाणे अंटीऑक्सिडेंट्स आणि ओमेगा-३ फॅटी अँसिडमुळे केसांतील लवचीकपणा वाढतो.

कुरळे केस : अवोकेडो ऑइल
केस रूक्ष आणि गुंता झाल्यामुळे विंचरता येत नाहीत. अशा केसांना किंवा कुरळ्या केसांसाठी अवोकेडो ऑइल (मेक्सिकोत आढळणारी एक प्रकारची वनस्पती) उपयुक्त ठरते. अवोकेडो तेलात प्रोटीन आणि अमिनो अँसिड मोठय़ा प्रमाणात असते. केसांचे बाहेरील आवरणावर असणारी छिद्रे भरण्यासाठी याची मदत होते. याच विटामिन ए,डी,आणि ई मुबलक प्रमाणात असते. आज भारतातील लहान मोठय़ा शहरात हे तेल उपलब्ध आहे.

भाजप नेत्यावर बलात्‍काराचा गुन्‍हा


मुंबई, दि. 8 मे - भाजप नेते मधू चव्‍हाण यांच्‍यावर लग्‍नाचे आमिष दाखवून बलात्‍कार केल्‍याचा गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. बलात्काराच्या आरोपानंतर मंगळवारी सायंकाळी काळाचौकी पोलिस ठाण्‍यातील पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. परंतु मधू चव्‍हाण यांनी सर्व आरोप फेटाळले असून न्‍यायालयाकडून न्‍याय मिळेल, असे त्‍यांनी सांगितले. मधू चव्‍हाण यांच्‍यावर यापूर्वीही शोषणाचे आरोप लागले आहेत. 2008 मध्‍ये त्‍यांची मुंबई भाजप अध्‍यक्षपदी निवड झाली त्‍यावेळी काही महिला कार्यकर्त्‍यांनी त्‍यांच्‍यावर शोषणाचे आरोप केले होते.

सायनमध्ये हमालाची हत्या


मुंबई, दि. ८ मे - तीन अज्ञात इसमांनी मिळून एका हमालाची निर्णुण हत्या केल्याची घटना बुधवारी पहाटे सायन कोहीवाडा येथे घडली. ही हत्या चोरी करण्याच्या उद्देशाने केली गेली असून, चोरट्यांनी मृत व्यक्तीचा मोबाईल आणि त्याच्याजवळील सुमारे २६०० रूपयांची रक्कम चोरून नेली. या पकरणी अज्ञात चाटट्यांविरूद्ध सायन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायन कोळीवाडा येथे राहणारे केदार पटेल आणि अच्छेलाल निषाद हे दोघेजण पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास तेथील गुरूकृपा इमारतीसमोरील रस्त्यावरून जात होते. त्यावेळी अचानक तिघा अज्ञातांनी त्यांना वाटेत अडवून चाकूच्या धाकाने त्यांच्याजवळील रक्कमेची मागणी केली. परंतु अच्छालाल यांनी नकार देताच तिघा चोरट्यांपैकी एकाने अच्छालाल यांच्या छातीत चाकू खूपसला. त्यानंतर अच्छालाल यांचा मोबाईल आणि २६०० रूपयांची रक्कम घेवून तिघे चोर फरार झाले. अच्छालाल यांना उपचारासाठी तेथील लोकमान्य टिळक रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. या पकरणी तीन अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

ज्वालामुखीच्या स्फोटात पाच गिर्यारोहक ठार


मनिला, दि. ८ मे - येथील फिलिपिन्समधील ज्वालामुखींपैकी ‘मॅयन’ या ज्वालामुखीचा मंगळवारी पहाटे स्फोट झाल्याने पाच गिर्यारोहकांचा मृत्यू झाला. हा स्फोट सौम्य स्वरूपाचा असला तरी, या स्फोटातून उडालेल्या दगडांमुळे या गिर्यारोहकांचा मृत्यू झाल्याचे फिलिपिन्स इन्स्टिट्यूट ऑफ व्होलकॅनॉलॉजीचे प्रमुख रेनॅटो सोल्डियम यांनी सांगितले. या स्फोटामुळे मध्य फिलिपिन्समध्ये राखेचे ढग जमा झाले होते.

रेनॅटो यांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅयन या ज्वालामुखीचा गेल्या ४०० वर्षांत सुमारे ४० वेळा स्फोट झाला आहे. गिर्यारोहकांच्या या पथकामध्ये आठ गिर्यारोहकांचा समावेश होता. सदर स्फोटानंतर त्यातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला. मृतांची ओळख अघाप पटलेली नाही. तसेच जखमी गिर्यारोहकाला उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले. या स्फोटानंतर कोणताही धोक्याचा इशारा देण्यात आलेला नाही.

Monday, 6 May 2013

नमस्कार... साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपले स्वागत...

मंगळवार, दि. 16 एप्रिल
काल मला माझ्या सरांचा फोन आला. एक खूशखबर आहे. सरांना दूरदर्शनवरील साडेनऊच्या बातम्यांमध्ये चर्चेसाठी बोलावले होते आणि सरांनी केवळ मलाच सांगितले होते. चक्क मला तिकडे सोबत येण्यासाठी आमंत्रण दिले. मी तेव्हा “सातव्या आसमान”मध्ये होती. वेब जर्नलिजम करताना सगळ्यांना तिकडे नेण्यात आले होते. पण मी तो चान्स मिस केला होता. सरांचा फोन चालूच असताना मला एकच गाणे सुचले, “चलो बुलावा आया है, बाबाने बुलाया है”.... मी त्याच क्षणी “हो” म्हणाले...

रात्रभर मी “खयालो में” होती. खरं सांगायचं तर माझ्या आनंदाला पारावर नव्हता.. रात्रभर एकच विचार मनात फिरत होता, उद्या मला दूरदर्शनवर जायचं आहे आणि तेही “लाईव्ह शो”. मी खूप खूश होते. तेवढ्यात मला आठवलं की, उद्या तर माझं ऑफिस आहे. आता काय करायचं... सरांनी जाऊ नाही दिलं तर... आणि इकडे या सरांना तर मी येणार सांगून मोकळी झाली... काय करायचं... अशा विचारांतच मला झोप कधी लागली कळालंच नाही...

सकाळी नेहमीप्रमाणे मी ऑफिसला गेले. तिकडे सरांना सांगितलं की मला दूरदर्शनवरील एका कार्यक्रमाला जायचं आहे आज, तर मी थोडं लवकर निघाली तर चालेल का... ते नाही बोलणारच नाहीत हे मला ठाऊक होतं. पण तरीही.... आणि मला संध्याकाळी 7 वाजता निघायची परवानगी मिळाली. याह्हू....

लोकल ट्रेन पकडून मी दादरला पोहोचली. तिथूनच आम्ही एकत्र वरळीला जाणार होतो. थोड्याच वेळेत सरदेखील तेथे आले. सरांनी काहीतरी खायला घ्यायला सांगितले. मी माझा आणि लेजचं मोठं पॅकेट घेतलं आणि आम्ही निघालो. खरं सांगायचं तर जर्नलिजम स्टुडंट असूनही मी प्रथमच दूरदर्शनच्या ऑफिसनध्ये गेले होते आणि तेही फक्त सरांमुळेच. प्रचंड ट्रॅफिकमधून आम्ही तेथे पोहोचलो. एखाद्या आलिशान महालासारखे वाटणारे दूरदर्शन केंद्र मला बाहेरूनच खूप आवडले. तिथे पोहोचल्यावर आम्हाला एका केबिनमध्ये बसवण्यात आले. कार्यक्रम सुरू व्हायला खूप वेळ होता. आम्हाला प्यायला थंडगार पाणी देण्यात आले. मी नेहमीप्रमाणे आजूबाजूचं निरीक्षण करू लागली...

थोड्याच वेळात न्यूज रिडर आशुतोष सावे आत आले. सरांनी माझी त्यांच्याशी ओळख करून दिली. मला खूप छान वाटलं. त्यानंतर सावे सरांनी सरांच्या हातात एक “प्रश्नावली” दिली. अर्थात त्या कार्यक्रमात नेमके काय प्रश्न विचारणार याची. एकंदरीत ती पद्धत माझ्या लक्षात आली. सरांनी ती व्यवस्थितपणे वाचली. त्यातल्या काही मुद्द्यांवर चर्चा केली. मी हे सगळं नीट पाहत होती. थोड्या वेळात सरांना “मेक-अप” रूममध्ये नेण्यात आले. मी तेथेच बसून राहिली. काही वेळ उलटला. तोपर्यंत माझं बहुतेक निरीक्षण करून झालं होतं...

सर आल्यानंतर आम्हाला थेट स्टुडिओमध्ये नेण्यात आले. मी आत शिरले आणि.... बाप रे..... इतके भलेमोठे कॅमेरे... छोटे-मोठे टीव्ही... भयाण शांतता... इतकी की टाचणीचे उदाहरण सोडा, तिथे असलेल्या प्रत्येकाच्या प्रत्येक हालचालींचे आवाज ऐकू येत होते. मी थोडं पुढे गेली आणि समोरच... जे रोज टीव्हीवर पाहायची ते आज प्रत्यक्षात पाहत होती. भलामोठा टेबल, पलिकडे दोन खुर्च्या आणि पाठीमागे महाराष्ट्राचा नकाशा असलेले “बॅकग्राऊंड”... मी खूप खूश होती. थोड्याच वेळात साडेनऊच्या बातम्या प्रसारित होणार होत्या..

9 वाजून 25 मिनिटे झाली होती. समोरच एका खुर्चीत सावे सर बसले होते आणि त्यांच्या बाजूलाच माझे सर... कॅमेरे आणि मायक्रोफोन वगैरे व्यवस्थित लावून घेण्यात आले. 9.28 झाले. पुढे काय होणार हे पाहण्यास मी फार उत्सुक होते. साऊंड... रोल कॅमेरा... ऍक्शन... “नमस्कार... साडेनऊच्या बातम्यांमध्ये तुमचे स्वागत आहे..”... एक-एक बातमी वाचण्यास सुरूवात झाली. ते कशाप्रकारे होत आहे, मध्येच टीव्हीवर ते दिसतात तर मध्येच एखादा व्हिडीओ... हे सगळं लक्षात यायला मला थोडा वेळ लागला, कारण मी हे सर्व प्रथमच पाहत होते. बातम्या सांगण्यात 10 मिनिटे गेली. आणि मग सरांशी चर्चा... सरांचा रेल्वे विषयावर खूप अभ्यास आहे. नुकत्याच झालेल्या चर्चगेट ते डहाणू या उपनगरीय रेल्वेबद्दल त्यांना बोलायचे होते. तशी चर्चा सुरू झाली. तीही 10 मिनिटे चालली...

आज प्रथमच मला एखाद्या न्यूज चॅनलवरील लाईव्ह शो पाहायला मिळाला. माझ्या निरीक्षणातून मला एक गोष्ट कळाली. न्यूज चॅनलमध्ये एक-एक सेकंद महत्वाचा असतो. आणि म्हणूनच त्यांचे कार्यक्रम यशस्वी आणि वेळेत पार पडतात. वेळ किती महत्वाची असते हे त्यांच्याकडून शिकायला मिळते. अशाचप्रकारे आपणही आपल्या आयुष्यात वेळेला महत्व दिले तर आपलीदेखील प्रत्येक कामे यशस्वीरित्या पार पडतील. चला तर मग, वेळेचे योग्य नियोजन करून कामाला लागू या.... यश तुमचेच आहे...

- मिनल माळी

आरोग्याच्या दृष्टीने हसण्याचे दहा महत्वपूर्ण फायदे

हसणे हे अनेक रोगांवर गुणकारी ठरू शकते. व्यग्र दिनक्रमात स्वत:साठी आनंदाचे दोन क्षण काढणे आरोग्याच्या दृष्टीने हितकारी ठरते. नियमित हसणे स्वभाव आणि आरोग्य दोन्हीसाठी चांगले आहे.
१. खाण्याची कमी इच्छा
मनमुराद आणि मोकळेपणाने हसल्याने शरीरात एंडोर्फिस हार्मोन सक्रिय होतात. ज्यामुळे खाण्याची इच्छा किंवा लालसा नियंत्रणात राहते. मूड खराब झाल्यावर  पीडित व्यक्तीला जास्त गोड किंवा चटपटीत खाण्याची तीव्र इच्छा होते.

२. अँटी एजिंग
चेह-यावरील स्नायू सक्षम ठेवणे आणि रक्तसंचार वाढवण्यात हसण्याची भूमिका महत्त्वाची असते. यामुळे चेह-यावरील टवटवीतपणा कायम राहतो. एका संशोधनानुसार मधुमेहाने पीडित लोकांनी जेवण केल्यानंतर कॉमेडी शो पाहिल्यास ब्लड शुगर ब-याच प्रमाणात नियंत्रणात राहतो.

३. प्रतिकार क्षमता
आनंदी राहिल्याने शरीराची प्रतिकार क्षमता आणि संसर्गासोबत लढणारी प्रणाली सक्षम होते. याच्यामुळे विविध संसर्ग आणि अ‍ॅलर्जीच्या प्रभावात येण्यापासून बचाव होतो. त्याचप्रमाणे अनेक आजारांना दूर ठेवण्याची शक्ती मिळते.

४. मूड बदला
एकटे राहण्यापेक्षा जे लोक मिळून मिसळून राहतात. ते तीस टक्के जास्त हसतात. यासाठी सदैव मित्रांसोबत राहा. नवे मित्र तयार करा. त्यांच्यासोबत चांगला वेळ व्यतीत करा.

५. हृदयासाठी फायदेशीर
एका संशोधनानुसार १० मिनिटे व्यायाम केल्याने जेवढी हृदयगती  तीव्र होते. तेवढ्या हृदयगतीसाठी एक मिनिट हसणे पुरेसे ठरते.

६. ऊर्जा वाढते
हसत राहिल्याने शरीरातील ऊर्जेच्या स्तरावर चांगला परिणाम होतो. या ऊर्जेमुळे तुम्ही काम किंवा वाचनावर लक्ष केंद्रित करू शकता. तसेच या पद्धतीने कामाची गुणवत्तासुद्धा वाढवता येते.

७. नात्यांसाठी उपयुक्त
हसमुख राहिल्याने व्यक्तीच्या मनात चांगले विचार येतात आणि त्याचे वागणे सकारात्मक राहते. क्लोज रिलेशनशिप असणा-यांमध्ये हास्य संबंध वृद्धिंगत करणारा घटक ठरतो. हसमुख आणि नेहमी उत्साही राहणा-या व्यक्तीकडे लोक आकर्षित होतात, असे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

८. तणावापासून मुक्ती
हसल्यामुळे स्टड्ढेस हार्मोन्स कार्टिसोल नियंत्रणात असतो. परिस्थिती कितीही तणावपूर्ण असू द्या. आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. यामुळे डोपामाइन आणि ग्रोथ हार्मोन्सची सक्रियता वाढते.

९. वजन नियंत्रणात
वजन वाढण्यासाठी जास्त खाणे आणि तणाव या गोष्टी जबाबदार असतात. आनंदी आणि हसमुख राहिल्याने तणाव वाढत नाही .त्याप्रमाणे चटपटीत खाण्याची इच्छा होत नाही परिणामी वजन नियंत्रणात राहते.

१०. वजन नियंत्रणात
वजन वाढण्यासाठी जास्त खाणे आणि तणाव या गोष्टी जबाबदार असतात. आनंदी आणि हसमुख राहिल्याने तणाव वाढत नाही .त्याप्रमाणे चटपटीत खाण्याची इच्छा होत नाही परिणामी वजन नियंत्रणात राहते.

११. दुखण्यावर नियंत्रण
हसल्यामुळे शरीरात एंडोर्फिस हा फील गुड करणारा घटक क्रियाशील झाल्याने  विविध भागात होत असलेले दुखणे कमी होते. हा रासायनिक घटक पेन किलरप्रमाणे काम करत असतो.