Monday, 17 December 2012

पत्नीला मारण्याच्या नादात दुसरीवर हल्ला


मुंबई, (वृत्तसंस्था) : एका इसमाने आपली पत्नी समजून दुसèयाच महिलेवर चाकूचा हल्ला केल्याची घटना दादर पूर्वेकडील स्वामी नारायण मंदिराजवळ सोमवारी सकाळी घडली. सदर जखमी महिलेला त्वरित सायन रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या घटनेनंतर दादर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

येथील नेहमी गजबजलेल्या दादर येथे सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास एका इसमाने एका महिलेवर अचानक चाकूचा वार केला. ही घटना घडताच आजूबाजूच्या नागरिकांनी आरडाओरड सुरू केली. पोलिस स्टेशन जवळच असल्याने पोलिसांनी लगेचच Ÿआरोपीस अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या पत्नीने घरगुती qहसाचाराबद्दल त्याच्याविरूद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानंतर काही दिवस तो पोलिस कोठडीत होता. याच गोष्टीचा राग मनात धरून त्याचा बदला घेण्यासाठी त्याने आपल्या पत्नीला संपवायचा कट रचला. त्यानुसार त्याने सकाळी ऑफिसला जाताना पत्नीला मारायचे ठरविले. परंतु गर्दीमुळे आपली पत्नी ओळखता न आल्याने त्याने चुकून दुसèयाच महिलेवर वार केला. सदर जखमी महिलेला सायन रूग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.


मिनल माळी
झी २४ तास आणि दिव्य मराठी

Wednesday, 12 December 2012

राज ठाकरेंविरोधातील याचिका फेटाळली


मुंबई, (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली. राज ठाकरे न्यायालयाबद्दल टीका करून न्यायालयाचा अवमान करतात, अशी याचिका त्यांच्याविरूद्ध दाखल करण्यात आली होती. परंतु न्यायालयात सुनावणीवेळी याचिकाकर्ते उपस्थित न राहिल्याने याचिका फेटाळण्यात आली. न्या. डी. डी. सिन्हा आणि न्या. के. के. ताथेड यांच्या खंंडपीठाने ही सुनावणी केली.

राज ठाकरे यांना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या काळात सभा घेण्यासाठी शिवाजी पार्कची जागा न दिल्यामुळे त्यांनी न्यायालयाच्या निर्णयावर टीका केली होती. अवमानकारक शब्द उच्चारून न्यायालयाचा अवमान केला होता. राज ठाकरे वारंवार असा प्रकार करीत असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अ‍ॅड. सय्यद अब्बास इजाज नक्वी यांनी केली होती. मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी होती. परंतु अ‍ॅड. नक्वी यावेळी न्यायालयात उपस्थित न राहिल्याने न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली.

मिनल माळी
दिव्य मराठी वेबसाईट

Tuesday, 11 December 2012

मनपा कर्मचाèयांच्या गाड्यांवर हल्ला

मुंबई, (वृत्तसंस्था) : वरळी येथील अ‍ॅनी बेझंट रोडवर काही अज्ञात लोकांनी मनपाच्या गाड्या आणि सुरक्षा रक्षकांच्या चौकीची तोडफोड केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. तोडफोडसोबतच त्यांनी मनपा कर्मचाèयांना मारहाणदेखील करण्यात आली.

काही अज्ञातां लोकांचा जमाव अचानकपणे महापालिकेच्या यानगृहात पोहोचला. त्यानंतर तेथे मनपाच्या गाड्यांची व सुरक्षा रक्षकांच्या चौकीची तोडफोड केली. तसेच मनपा कर्मचाèयांना मारहाण केली. त्यानंतर वरळीतीलच लव्हग्रो पम्पिंग स्टेशनजवळील सुरक्षा रक्षकांच्या चौकीची तोडफोड केली. तोडफोड करणाèयांबद्दल आपणास काहीही माहिती नसल्याचे मनपा कर्मचाèयांचे म्हणणे आहे.

मिनल माळी

एकतर्फी प्रेमातून दोघींवर अ‍ॅसिड हल्ला


मुंबई, (वृत्तसंस्था) : एकतर्फी प्रेमातून दोन तरूणींवर अ‍ॅसिड हल्ला केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी कांदिवलीतील हनुमान नगरमध्ये घडली. दोन्ही तरूणी या हल्ल्यात गंभीरपणे भाजल्या गेल्या असून, त्यांना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी सदर दुष्कृत्य करणाèया आरोपीस अटक केली आहे.

सचिन शिगवण (२६) असे आरोपीचे नाव असून, श्रद्धा लांडगे आणि मिलन या दोघीजणी रस्त्यातून जात असताना या तरूणाने त्यांच्यावर अ‍ॅसिडचा हल्ला केला. त्यानंतर तो तेथून पळून गेला. परंतु पोलिसांनी सदर आरोपीस अटक केली असून, आपण हे कृत्य एकतर्फी प्रेमातून केले असल्याचे त्याने पोलिसांनी चौकशीदरम्यान सांगितले.


मिनल माळी
महाराष्ट्र टाईम्स वेबसाईट

Sunday, 9 December 2012

My News



बांग्लादेशी नागरिक पोलिसांच्या रडारवर
वसई, (प्रतिनिधी) : मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने ठाणे ग्रामीण क्षेत्रांतून शेकडो बांग्लादेशींची धरपकड केल्यानंतर वसई पोलिसांनी देखील आपल्या हद्दीत कसून शोध घेऊन चार बांग्लादेशी नागरिकांना आज अटक केली आहे. वसई विरार परिसरात बांग्लादेशींचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

वसई पोलिस ठाणे हद्दीतील वसई कोळीवाडा मस्जिदच्या पाठीमागे मोकळ्या जागेत पत्र्याच्या शेडमध्ये काही परदेशी नागरिक वास्तव्यास असल्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास वसई पोलिसांच्या टीमने या ठिकाणी छापेमारी करुन चार जणांना अटक केली.

१२-१२.३५

Saturday, 25 August 2012

Gutkha & Sigret


तंबाखू, गुटखा यांच्यासारख्या पदारथांवर सरकारने बंदी घातली असून देखील काही ठिकाणी अजूनही गुटखा, सिगारेट यांसारखे पदार्थ विकले जात आहेत. या सर्वांना केवळ जनताच नाही, तर सरकारसुद्धा जबाबदार आहे. अशा प्रकारच्या पदार्थांच्या विक्रीवर जर सरकारने अत्यंत कडक अशी शिक्षा ठेवली, तर कोणीही त्या पदार्थांचा विचारसुद्धा करणार नाही.

अजूनही प्रत्येक पानाच्या ठेल्यावर सर्रास तंबाखू आणि सिगारेट यांची विक्री होत आहे. मी अनेक अशी दुकाने पहिली आहेत. विकणारा विकत आहे, मग विकत घेणारा का नाही घेणार ? सर्वात महत्वाचे, सरकारने जर अशा पदार्थांचे उत्पादनच थांबवले तर.... तर कोणताही दुकानदार ते विकूच शकणार नाही. त्यांच्यामुळे सामान्य जनतेला किती त्रास होतो याचा कोणीच विचार करत नाही. आज सरळपणे अगदी शिक्षित व्यक्तीसुद्धा सिगरेट पिताना दिसतो. पण त्याच्या सिगरेटच्या धुरामुळे बाकीच्या लोकांना त्रास होत आहे, याचा तो जराही विचार करत नाही.

माझ्या मते तर, अशा लोकांसाठी एकाच शिक्षा योग्य आहे.
१. जर कोणी पानवाला आपल्या दुकानावर अशा प्रकारचे पदार्थ विकताना दिसला, तर जो कोणी त्याला बघेल त्याने हक्काने त्याच्याकडून शिक्षेचे पैसे घ्यावेत. असा नियमच बनवायला पाहिजे सरकारने.
२. तसेच पिणाऱ्याच्या पण बाबतीत करायला पाहिजे. जेणे करून त्यांना अकाल येईल की आपण जे करतोय त्यामुळे आपणाला शारीरिक तसेच आता आर्थिकसुद्धा नुकसान होत आहे. मग तो पिणे हि हळूहळू थांबवेल.

हे सर्व लगेच तर होणार नही, पण एक दिवस हा महाराष्ट्र तसेच संपूर्ण भारत देश व्यसन मुक्त होईल.

धन्यवाद...
मिनल माळी.