Friday, 22 March 2013

रत्नागिरी अपघातः ३७ जणांचा मृत्यू

रत्नागिरी : खेडजवळ जगबुडी नदीत खासगी बस कोसळून झालेल्या भीषण अपघातातील मृतांची संख्या ३७ वर पोहचली आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. आतापर्यंत २६ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृतकांची ओळख अद्याप पटलेली नाही. अपघातग्रस्त बस महाकाली टड्ढॅव्हल्सची होती.

आजच्या अपघाताचे मुख्यकारण म्हणजे चालकाची चूक आहे. मुंबई-गोवा मार्गाच्या चौपदीकरणास उशीर झाल्याचे भास्कर जाधव  यांनी मान्य केले आहे.

महाकाली टड्ढॅव्हल्सकडे प्रवाशांची यादीच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. त्यामुळे मृतकांची ओळख पटवण्यात प्रचंड अडचण होत आहे. खासगी टड्ढॅव्हल्समध्ये अनेक प्रवासी विविध थांब्यांवरुन बसविण्यात येतात. त्यांना केवळ एक पावती देण्यात येते. त्यावर प्रवाशांचे नाव, संपर्क क्रमांक किंवा पत्त्याची नोंद नसते.

अपघातग्रस्त बस गोव्याहून मुंबईच्या दिशेने येत असताना, पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. प्रवाशांनी भरलेली ही बस १५० फूट उंचीवरून खाली नदीत कोसळली. पुलाच्या उजव्या बाजूचा कठडा तोडून ही बस नदीत टपावरच कोसळली. त्यामुळे पहाटेच्या गाढ निद्रेत असणार्या बेसावध प्रवाशांना सावध होण्याची संधीही मिळाली नाही. क्षणातच होत्याचे नव्हते झाले.

या अपघातानंतर दोन्ही बाजूकडील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई-गोवा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मृत प्रवाशांपैकी बहुतांश प्रवासी मुंबई आणि गोव्याचेच असल्याचा अंदाज आहे. अपघातग्रस्त बसचा चालक बचावला आहे. त्यामुळे तो अपघाताबद्दल माहिती देऊ शकेल.

बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. क्रेनच्या साहाय्याने बस उचलण्याचे प्रयत्न सुरु आहेत. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज रत्नागिरीचे पालकमंत्री भास्कर जाधव यांनी व्यक्त केला आहे.
चालक एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात होता. त्याचवेळी बस कठड्याला बस घासल्या गेली. पुल जुना आहे. त्यामुळे कठडा हा धक्का सहन करु शकला नाही. त्यामुळे बस थेट नदीपात्रात टपावरच कोसळली. सकाळी क्रेन बोलाविण्यात आल्यानंतर बस उचलून सरळ करण्यात आली. त्यानंतर मृतदेहांना बाहेर काढण्यात आले.

Thursday, 21 March 2013

१९९३ ब्लास्ट: अभिनेता संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा, याकूब मेननला फाशी

नवी दिल्ली / मुंबई- सन १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याला जबरदस्त हादरा बसला आहे. सुप्रीम कोर्टाने संजय दत्त याला पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयानंतर संजय दत्तला तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी याकूब मेमन यांची फाशी सुप्रीम कोर्टाने कायम ठेवली आहे. मात्र अन्य दहा आरोपींची फाशीची शिक्षा कोर्टाने जन्मठेपेत बदलली आहे. याशिवाय कोर्टाने १९  पैकी १७ जणांची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. एका आरोपीची जन्मठेप १० वर्षे कैदेत बदलण्यात आली. तर एका महिला आरोपीची शिक्षा पूर्ण झाल्याचे निर्देशही कोर्टाने दिले आहे.

याकूब मेमन हा सर्वात मोठा गुन्हेगार असून तोच या ब्लास्टचा तो 'मास्टर माईंड' असल्यामुळे त्याची फाशी कायम ठेवण्यात आल्याचेही कोर्टाने निकाल देताना म्हटले. याप्रकरणी 'टाडा' न्यायलयाने योग्य ती प्रक्रिया पूर्ण करूनच निकाल दिल्याचे सुप्रीम कोर्टाने अंतिम निकाल देताना म्हटले आहे. उल्लेखनीय म्हणजे टाडा कोर्टाच्या निकालावर तांत्रिक दृष्ट्या आक्षेप घेणार्या सर्व याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावल्या आहेत.

सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर संजय दत्तला तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. त्याला कमीत कमी साडेतीन वर्षे तुरूंगात काढावे लागणार आहे. संजय याने यापूर्वी दीड वर्षे शिक्षा भोगली होती. संजयला चार आठवड्यात पोलिसांना शरण जावे लागणार आहे. कोर्टाने निकाल जाहीर करताच संजय दत्तची बहिण आणि खासदार प्रिया दत्त यांना अश्रु आवरता आले नाही. यावेळी  संजयची पत्नी मान्यताही उपस्थित होती. यापूर्वी टाडा न्यायालयाने संजय दत्तला सहा वर्षांची शिक्षा ठोठावली होती. सुप्रीम कोर्टाने त्यात एक वर्ष कपात करून संजयला पाच वर्षांच्या शिक्षेवर शिक्का मोर्तंब केला.

दुसरीकडे, या निकालाच्या पाश्र्वभूमीवर मुंबई शहरात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह उपनगराच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. निमलष्करी दलालाही पाचारण करण्यात आले आहे.
सुनावणीच्या काळात संजय दत्तने याआधी दीड वर्ष तुरुंगात काढले आहे. सर्वोच्च न्यायालयाने टाडा न्यायालयाचा निकाल कायम ठेवल्यास त्याला उर्वरित शिक्षा भोगावी लागेल. सर्वोच्च न्यायालयात १ नोव्हेंबर २०११ रोजी सुरू झालेली सुनावणी ११ महिन्यांत पूर्ण झाली. न्यायालयाने ऑगस्ट २०१२ मध्ये खटल्याचा निकाल राखून ठेवला होता.

एके ५६ बंदूक बाळगल्याबद्दल त्याला नोव्हेंबर २००६ मध्ये दोषी ठरवण्यात आले होते. मात्र, बॉम्बस्फोटात सहभाग असल्याच्या गंभीर आरोपातून त्याची मुक्तता करण्यात आली होती.

संजय दत्त याला शिक्षा सुनावल्यानंतर बॉलिवूडचे २०० कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे संजयच्या आगामी तीन मोठ्या चित्रपटांवर मोठा परिणाम होणार आहे. ङ्कपीकेङ्क, ङ्कपोलिसगर्लङ्क आणि ङ्कउंगलीङ्क या चित्रपटांचा त्यात समावेश आहे. संजय दत्तला शिक्षा सुनावताच त्याचे मित्र बंटी वालिया, मुरली, एमएलए बाबा सिद्दकी त्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहचले आहेत.
सन १९९३च्या साखळी स्फोटात कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमसह पाकिस्तानचा हात असल्याचे कोर्टाने म्हटले आहे.

याप्रकरणी टाडा न्यायलयानं योग्य ती प्रक्रिया पूर्ण करूनच निकाल दिल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.
टाडा कोर्टाच्या निकालावर तांत्रिक दृष्ट्या आक्षेप घेणार्या सर्व याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावल्या आहेत. मुंबई साखळी ब्लास्ट प्रकरणी टाडा कोर्टाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. दुसरीकडे सीबीआयन ५७ जणांची शिक्षा वाढविण्याचा आग्रह केला होता.

Tuesday, 19 March 2013

पोलिस विभागाची माफी मागतो, त्या अधिका-याची नाही - आमदार क्षितीज ठाकूर


मुंबई - पोलिसांच्या विरोधात माझे भांडण नाही, त्या अधिका-याची भाषा अश्लिल होती, चुकीची होती त्यामुळे त्याची माफी मागण्याचा प्रश्नच नाही, असे वक्तव्य विधिमंडळात पोलिस अधिकार्याला मारहाण करण्याचा आरोप असलेल्या आमदार क्षितीज ठाकूर यांनी केले आहे.

विधिमंडळातील संपूर्ण प्रकारात सभागृहातील आमदार माझ्या पाठीशी उभे राहिले त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. झालेल्या प्रकाराची सर्व जबाबदारी मी माझ्यावर घ्यायला तयार आहे. या प्रकरणात जर मी दोषी अढळलो तर, राजीनामा देण्याची माझी तयारी असल्याचे आमदार ठाकूर यांनी म्हटले आहे.

मंगळवारी दुपारी निलंबीत सहायक वाहतूक पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना विधिमंडळाच्या गॅलरीत काही आमदारांकडून जबर मारहाण करण्यात आली होती. आमदार क्षितीज ठाकूर यांच्यासह आमदार राम कदम, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार राजन साळवी आणि आमदार जयकुमार रावल यांच्यावर मारहाणीचा आरोप आहे. दिवसभर माध्यमांमध्ये आमदारांवर मारहाणीचा आरोप झाल्यानंतर हे सर्व आमदार क्षितीज ठाकूरसह सायंकाळी मंत्रालय परिसरात पत्रकारांच्या समोर आले.

यावेळी आमदार ठाकूर यांनी निलंबीत सुर्यवंशी हेच अरेरावी करत होते. त्यांची भाषा अश्लिल आणि अर्वाच्च होती. लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठांशी कसे बोलावे याचे भान त्यांना नाही. त्यांना पुन्हा प्रशिक्षणाची गरज आहे. कोणत्याही आमदारांनी त्यांना मारहाण केले नाही, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

सोमवारी वांद्रे वरळी सी-लिंकवर झालेल्या प्रकाराचे मोबाईल शुटिंग त्यांनी पत्रकारांना दाखवले. त्याची सीडी तयार केली असून ती माध्यमांना देणार आहे. जर मी चुकीचे वागलो असतो तर मी शुटिंग कशाला केली असती असा सवाल त्यांनी पत्रकारांना केला.
सूर्यवंशींना मारहाण केली नाही - राम कदम

मनसे पक्ष कायम पोलिसांच्या हिताचे काम करत आला आहे. निलंबीत पोलिस अधिका-याच्या विरोधात आज हक्कभंग प्रस्ताव सादर करण्यात आला त्यावेळी तो सभागृहाच्या गॅलरीत बसलेला होता. सभागृहाच्या नियमाप्रमाणे ज्या व्यक्तीच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर केला जातो त्याला तिथे उपस्थित राहण्याचा अधिकार नाही. असे असताना सूर्यवंशी तिथे उपस्थित होता आणि वरूनच अश्लिल हातवारे आणि आमदारांना शिवीगाळ करत होता. त्यामुळे अनेक आमदार गॅलरीकडे गेले. तेव्हा त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मला धक्का दिला. मी खाली पडलो होतो.

माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या चूकीच्या असल्याचे सांगत ते म्हणाले, त्यावेळी तिथे केवळ चार - पाच नव्हे तर जवळपास पन्नास आमदार होते.  माध्यमांच्या प्रतिनिधींना ज्या आमदारांचे चेहरे लक्षात आहेत त्याच आमदारांनी मारहाण केल्याचे माध्यमांमध्ये सांगितले गेले, असे सांगून त्यांनी मारहाणीचा आरोप फेटाळून लावला.

पोलिसांना मारहाण करण्याची माझ्या पक्षाची संस्कृती नसल्याचे कदम म्हणाले. माध्यांनी सभागृहातील व्हिडिओ फुटेज तपासून पाहावे त्यातून सत्य बाहेर येईल, असेही ते म्हणाले.

Friday, 15 March 2013

केंद्र सरकारचे एक पाऊल मागे... युपीएससी द्या आता मराठीत

नवी दिल्ली- यूपीएससी परीक्षेतून प्रादेशिक भाषांना वगळण्याचा निर्णय काही दिवसातच सरकारला स्थगित करावा लागला आहे. देशातील नागरिकांच्या व युवकांच्या तीव्र नाराजीनंतर सरकारला हा निर्णय स्थगित करण्यास भाग पाड़ले. याचबरोबर शिवसेना व जयललिता यांच्या पक्षाने याबाबत नाराजी व्यक्त करीत पंतप्रधानांना हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने मागील पंधरवड्यात यूपीएससीचा नविन पॅटर्न सादर केला होता. त्यात प्रादेशिक भाषांचा पेपर वगळण्यात आला होता. मात्र स्थानिक भाषांना वगळण्याचा निर्णय जाहीर होताच देशभरातील युवकांत नाराजी पसरली होती. भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) सेवा वगळता यूपीएससीद्वारे निवडले जाणा-या सर्व उमेदवारांना भारतात सेवा करावी लागते. मग प्रादेशिक भाषा वगळण्याचा हट्ट कशासाठी असा सवाल उपस्थित केला जात होता. त्यातच प्रादेशिक भाषा वगळल्याने व इंग्रजीचे महत्त्व वाढवल्याने अशा परीक्षांचा फायदा फक्त इंग्रजी माध्यम व शहरी मुलांना होईल, असा प्रचार राजकीय पातळीवर करण्यात आला होता. त्यामुळे सरकारने याची गंभीर दखल हा निर्णय तात्पुरता का होईना स्थगित करण्याचा निर्णय घेतला. याबाबतची घोषणा संसदीय कामकाजमंत्री नारायण सामी यांनी लोकसभेत आज दुपारी केली.

पेट्रोल 2.40 पैशांनी स्वस्त

नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण झाल्याने भारतातील तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर सुमारे 2.40 पैशांनी (देशातील विविध शहरात वेगवेगळा फरक) स्वस्त झाले आहे. दुष्काळाच्या व महागाईच्या झळा पोहचणा-या सामान्यांना हा मोठा दिलासा आहे. तेल कंपन्यांनी पंधरवड्यात तेलाच्या खरेदी-विक्रीचा फेरआढावा घेतल्यानंतर हा निर्णय जाहीर केला. नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होतील. याचबरोबर डिझेलच्या दरात 50-60 पैसे वाढ होणार होती. मात्र आता लागलीच डिझेल दरवाढ होणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. आमच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसात डिझेलच्या दरात वाढ होऊ शकते. 

मार्चच्या पहिल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले होते. त्यामुळे मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात पेट्रोलसह डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली होती. मात्र मार्चच्या दुस-या आठवड्याच्या समाप्तीला आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा भाव प्रतिबॅरल 131 डॉलरवरुन तो 120 डॉलर प्रतिबॅरल इतका घसरला. त्यामुळे भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल 2.40 पैशांनी स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

Thursday, 14 March 2013

केसातील कोंडा घालवण्‍यासाठी करा हे घरगुती उपाय



केसात कोंडा (डेंडड्ढफ) होने ही सामान्य समस्या असली तरी ती शारीरिक आणि मानसिक त्रास देणारी ठरते. या समस्येकडे दूर्लक्ष करून चालणार नाही. केसात कोंडा झाल्याने आपल्या केस सौंदर्यहीन होतात. डोक्यात वारंवार खाज येते. त्यामुळे आपल्याला चारचौघात मान खाली घालावी लागते.

केसातील कोंडा घालविण्यासाठी बहुतेक जण बाजारात उपलब्ध असलेले विविध कंपन्यांचे एंटी डेंडड्ढफ शॅम्पू वापरतात. परंतु, शॅम्पू, तेल यांचा जोपर्यत वापर होतो तोपर्यंतच आराम पडतो. त्यानंतर मात्र पुन्हा कोंडा दिसायला लागतो. केसातील कोंडा कायमचा घालविण्यासाठी जाणून घ्या घरगुती टिप्स-

- ग्लिसरीन आणि गुलाब जल यांचे मिश्रण एका काचाच्या बाटलीत भरून ठेवावे. अंघोळ झाल्यानंतर दररोज ग्लिसरीन मिश्रीत गुलाब जल हातावर घेऊन केसाची हलक्या हाताने मालिश करावी. यामुळे केसातील कोंडा कायमचा नष्ट होतो.

- खोबरेल तेल आणि कापूर एकत्र करून केसात लावावे. काही दिवसांत केसातील कोंडा कमी झालेला दिसेल.

- लिंबाचा रस केसात लावल्याने कोंडा कमी होतो.

- लिंबाचा रस आणि खोबरेल तेल केसात लावण्याने कोंड्यापासून आराम मिळतो.

- दही आणि लिंबाच्या रसाने केस धुतल्याने कोंडा कमी होतो.

- केसातील कोंडा कमी करण्यासाठी लिंबाच्या पत्त्यांची पावडरने केस धुवावेत.

-आवळ्याची पेस्ट केसाना लावावी. त्यानंतर २० मिनिटांनी केस धुवून टाकावे. केसातील कोंडा नाहीसा होतो तसेच केस मुलायम होतात.

- रात्री झोपण्याअगोदर केसात तेल लावावे.

मेथी खाण्याचे हे आहेत चमत्कारिक फायदे


मेथी ही एक अशी भाजी आहे, जी चवीला कडू असली तरी आरोग्याच्या दृष्टीने फार महत्वात्वाची आहे. मेथीचा उपयोग भाजीसाठी तर मेथीच्या दाण्यांचा (मेथ्या) उपयोग मसाला पदार्थांमध्ये होतो. मेथीचे सेवन सर्वजणच करतात, परंतु यामधील औषधी गुणांची माहिती फार कमी लोकांना माहित आहे.

लो-ब्लडप्रेशर - मेथीच्या भाजीत अद्रक, गरम मसाला टाकून खाल्याने लो-ब्लडप्रेशरमध्ये फायदा होतो.

अ‍ॅसिडिटी - ज्या लोकांना अ‍ॅसिडिटीचा त्रास आहे, त्यांनी मेथीच्या रसाचे सेवन करावे. अल्सरचा त्रास असेल तर ताकात मेथी टाकून ते ताक प्यावे. सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे दाणे खाल्याने पोट साफ राहते. मेथीमुळे त्वचेशी संबंधित आजार आणि मलावरोधातून सुटका होते. तसेच यामुळे मेटाबॉलिक रेटही तीव्र होतो.

कोलेस्टड्ढॉल संतुलन - डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मेथी हृदयाचा आजार असणा-या  लोकांसाठी वरदान आहे. मेथीचे नियमित सेवन करून कोलेस्टड्ढॉलचे प्रमाण संतुलित ठेवू शकता. एक ग्लास पाण्यात मेथीचे दाणे रात्रभर भिजवून ठेवावेत आणि सकाळी उठून चावूनचावून खावेत.
डायबेटीस - मेथीमध्ये असलेले भरपूर फायबर आणि स्टेरॉइड दोन पद्धतीने काम करतात. एक म्हणजे शरीरात इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवतात. डायबेटीसच्या रुग्णांसाठी नियमित मेथीचे दाणे खाणे चांगले आहे.

उर्जा वाढते - मेथीमुळे शरीरातील उर्जा वाढते. मेथी दाण्यांमुळे प्रतिकारशक्तीतही वाढ होते. नियमित मेथीचे सेवन करणाऱ्या व्यक्तीला कमजोरी राहत नाही.

थोडी मेथी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. याची पेस्ट तयार करून दुसर्या दिवशी केसांच्या मुळाला लावावी व नंतर साध्या पाण्याने केस धुवावे. यामुळे केस गळणार नाहीत व केसातील कोंडा दूर होईल.

Wednesday, 13 March 2013

आता मराठीतही रंगणार 'केबीसी'चा खेळ


'लॉक किया जाये' असे म्हणत 'कोन बनेगा करोडपती'चा खेळ हिंदी वाहिनीवर जोरात रंगला. आता हिंदीनंतर हा शो  'कोण होईल मराठी करोडपती'च्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी माणसाला सामान्य ज्ञान आणि शिक्षण यांच्या जोरावर तब्बल एक कोटींचे बक्षीस जिंकण्याची सुवर्णसंधी या शोच्या माध्यमातून मिळणार आहे. ई टीव्ही वाहिनीवर हा शो लवकरच सुरु होणार आहे.

ई टीव्ही वाहिनीने सोनी पिक्चर्स टेलिव्हिजनकडून निर्मिती आणि प्रसारणाचे हक्क मिळविले असून मराठी दर्शकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग मिळवण्यासाठी आणि त्याला कधीही अनुभवायला मिळाले नसेल अशा स्वरुपात या कार्यक्रमाची निर्मिती करण्यासाठी बिग सिनर्जीबरोबर भागीदारी केली आहे.

२०१३ च्या उन्हाळ्यात हा कार्यक्रम सुरु होण्याची शक्यता आहे. मात्र हा कार्यक्रम कोण होस्ट करणार हे अदयाप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.

चला तर अमिताभ बच्चन यांनी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवलेल्या या ङ्ककोन बनेगा करोडपतीङ्कची मराठी आवृत्तीही प्रेक्षक डोक्यावर घेतील अशी आशा व्यक्त करायला हरकत नाही.



नाशिक-पुणे व मनमाड-इंदूर या दोन नव्या रेल्वेमार्गांना मंजुरी


नवी दिल्ली- रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी आज महाराष्ट्रातील दोन नव्या रेल्वेमार्गांना मंजुरी दिली. यात ब-याच वर्षांपासून नागरिकांची व औद्योगिक क्षेत्राकडून सातत्याने मागणी होणा-या नाशिक-पुणे रेल्वेमार्गाला मंजुरी देण्यात आली. याचबरोबर मनमाड ते इंदूर या रेल्वेमार्गालाही मंजुरी देण्यात आल्याची घोषणा बन्सल यांनी आज लोकसभेत केली.

मनमाड- इंदूर या नव्या रेल्वेमार्गामुळे महाराष्ट्र व मध्यप्रदेशमधील औद्योगिक क्षेत्रासह दळण-वळणाला मोठा फायदा होणार आहे. नाशिक-पुणे या स्वतंत्र मार्गाची ब-याच वर्षापासूनची मागणीही अखेर बन्सल यांना मान्य करावी लागली आहे. पुणे आणि नाशिक ही दोन शहरे महाराष्ट्रातील दुस-या व तिस-या क्रमांकाची शहरे आहेत. याचबरोबर वेगाने विकसित होणा-या देशातील टॉप-१० शहरातही पुणे-नाशिकचा समावेश आहे.

बन्सल यांनी मागील महिन्यात मांडलेल्या रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर अन्याय झाल्याची तक्रार राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी व खासदारांनी केली होती. यात काँग्रेसच्या खासदारांचाही समावेश होता. त्याची दखल घेत अखेर बन्सल यांनी महाराष्ट्रावर झालेला अन्याय काही प्रमाणात भरुन करताना मध्यप्रदेशलाही गोंजारले आहे. इंदूर शहरही वेगाने विकसित होत आहे. त्यामुळे या शहराची कनेक्टिविटी मनमाडद्वारे महाराष्ट्राशी जोडली जाणार आहे.

विरारमध्ये गोळीबार ; दोघांना अटक


विरार - विरार पूर्वेकडील बिल्डर कुलदीप महादेव चौधरी ( २७ ) यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने मंगळवारी पहाटेत्यांच्या घरासमोर गोळीबार झाल्याची घटना घडली . यात चौधरी बचावले असून त्यांचा एक मित्र जखमी झाला. याप्रकरणी विरार पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

विरार पूर्व मनवेलपाडा रोड , मिटबाववाडी येथील चौधरी यांच्या घरासमोर ही घटना पहाटे दीडच्या सुमारासघडली . कुलदीप आपल्या तीन मित्रांसह चित्रपट पाहून घराजवळ स्कोडा सुपर कारमधून परतले . त्यावेळीदुचाकीवरून आलेल्या चेहरा झाकलेल्या आरोपींनी कुलदीप याच्या दिशेने गोळीबार केला . मात्र कुलदीप चौधरीयांनी कारमधून उडी मारल्याने त्यांना गोळी लागली नाही , मात्र त्यांचा मित्र हरीशंकर बच्चुलाल दुबे जखमीझाला . त्याच्या डाव्या पायावर एक गोळी लागली . त्याच्यावर नालासोपाऱ्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारकरण्यात येत आहेत .

याप्रकरणी मेहुल चोडणकर ( २८ ) व चंदू पाटील या दोघांना विरार पोलिसांनी अटक केली आहे . मेहुल हाकुलदीप चौधरी यांच्या आयरिश ग्रुप ऑफ कंपनीमध्ये कामाला होता . मेहुल याने बुकिंगच्या सुमारे ५० ते ६०लाख रूपयांचा हिशोब ऑफिसच्या रेकॉर्डवर ठेवला नाही , ही रक्कम गहाळ केली व घोटाळा केला असा संशयकुलदीप यांना काही दिवसांपूर्वी आला . चौधरी यांच्या कंपनीतून बाहेर पडलेल्या मेहुल याने स्वत : चे बांधकामव्यवसायाचे कार्यालय सुरू केले होते . यातून दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता.
गेले काही दिवस कुलदीप वमेहुल यांच्यात सुरू असलेल्या वादाचे पर्यावसान या घटनेत झाले आहेत . कंपनीतील पैशाच्या अपहाराचा रागम्हणून काही दिवसांपूर्वी कुलदीप याने आरोपी मेहुल यालाही बॅटने मारले होते , असे सूत्रांनी सांगितले . कुलदीपयांच्या तक्रारीनुसार या आरोपींना अटक करण्यात आले आहे .

'आत्मा'ला प्रमोट करण्यासाठी नच बलियेत पोहोचली बिपाशा


'नच बलिये' या डान्स रिअ‍ॅलिटी शोचा हा आठवडा असणारेय 'आत्मा' स्पेशल. होय कारण या आठवड्यात बिपाशा बसू आपल्या आगामी 'आत्मा' सिनेमाला प्रमोट करण्यासाठी नच बलियेच्या सेटवर आली आहे. सुपरनॅचरल डड्ढामा असलेला 'आत्मा' हा सिनेमा येत्या २२ मार्चला रिलीज होणार आहे. या सिनेमात बिपाशा बसू आणि नवाजुद्दीन सिद्दीकी प्रमुख भूमिकेत आहेत.

सिनेमाची रिलीज डेट जवळ आल्यामुळे बिपाशा आपल्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या आठवड्यात ती स्मॉल स्क्रिनवर गाजत असलेल्या नच बलियेत आपला सिनेमा प्रमोट करणार आहे. यावेळी बिपाशाबरोबर नवाजुद्दीन सिद्दीकीनेही नच बलियेच्या मंचावर हजेरी लावली. शोमध्ये बिपाशा व्हाइट साडीत दिसली. तिचा हा लूक खूपच अपिलिंग होता. बिपाशा आणि नवाजुद्दीन यांनी सेलिब्रिटी कपल्सचे परफॉर्मन्स एन्जॉय केले.

श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला; ५ जवान शहीद


श्रीनगर - श्रीनगरमध्ये दहशदवाद्यांनी हल्ला केला आहे. बिमना परिसरातल्या शाळेबाहेर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे पाच जवान शहीद झाले आहेत. तर दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सीआरपीएफच्या जवानांना यश आलं आहे. पब्लिक स्कूलच्या मोकळ्या मैदानात विद्यार्थी क्रिकेट खेळत असताना दहशतवाद्यांनी गोळीबार केला. सुदैवाने यात कोणत्याही विद्याथ्र्याला मात्र इजा झाली नाही.

सुत्रांच्या माहितीनुसार सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला केल्यानंतर दहशतवाद्यांनी या भागातील एका शाळेमध्ये आसरा घेतला. त्याचवेळेस काही विद्यार्थी मैदानावर खेळत होते. त्यानंतर मात्र सीआरपीएफच्या जवानांनी शाळेला घेराव घातला. त्यात झालेल्या गोळीबारात पाच सीआरपीएफ जवान शहीद झाले आहेत. तर सात जवान जखमी झाले आहेत.

अजूनही शाळेत काही अतिरेकी लपले आहेत का? याचा जवान शोध घेत आहेत. शाळेच्या परिसरातून दोन दहशतवाद्यांचे शव ताब्यात घेण्यात आले आहे. अजूनही पुन्हा एकदा गोळीबार सुरू असल्याचे नुकताच हाती आलेल्या वृत्तावरून समजते आहे.

मानदुखीवर करा हा आरामदायी व्यायाम


हलका व्यायाम मानदुखीसाठी फायदेशीर असतो. यामुळे स्नायू रिलॅक्स होण्यास मदत मिळते. या व्यायामामुळे स्नायूंचा रक्तप्रवाह वाढेल आणि स्नायू दुखण्याचेही थांबेल. अशा प्रकारे तुम्हाला लवकर आराम मिळेल.

टिल्ट स्टड्ढेच - खुर्चीवर रिलॅक्स होऊन बसा. आता डाव्या हाताने डोक्याला मागच्या बाजूने आधार देत उजव्या खांद्याकडे झुकवण्याचा प्रयत्न करा.

चिन टक स्टड्ढेच - खुर्चीवर बसूनच हनुवटी खालच्या बाजूने झुकवत छातीकडे घेऊन या. डोक्याला वरून आधार देत असे करा.

साइड टू साइड रोटेशन - खुर्चीवर सरळ बसा आणि आता हळूहळू आपला चेहरा उजव्या बाजूने फिरवा. यानंतर चेहरा डाव्या बाजूने फिरवा. चेहरा बळजबरीने फिरवल्यास त्रास वाढू शकतो. त्यामुळे शक्य होईल तेवढाच फिरवावा.

हे लक्षात ठेवा - वर दिलेल्या सर्व व्यायामाच्या दोन स्टेप्स करा आणि प्रत्येक सेटमध्ये १२ रिपिटेशन्स करा. तसेच प्रत्येक पोझिशनमध्ये २० सेकंदांपर्यंत होल्ड करा.

Tuesday, 12 March 2013

रामसिंगची हत्या करून फासावर लटकवले; मानेवर आढळली जखम


नवी दिल्ली- दामिनी गँगरेप प्रकरणातील मुख्य आरोपी रामसिंगच्या आत्महत्येवरून वाद आणखी चिघळला आहे. रामसिंगच्या कुटुंबिय आणि वकीलाने हा खूनाचा प्रकार असल्याचे म्हटले आहे. पोस्टमॉर्टमच्या प्राथमिक अहवालानुसार फास बसल्यामुळेच रामसिंगचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. रामसिंगच्या शरीरावर आणि मानेवर बोटांचे ठसे दिसून आल्याचे  त्याच्या भावाने म्हटले आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी या घटनेची न्यायालयीन चौकशी होणार असल्याचे सांगितले.

रामसिंगच्या वडीलांनी तर रामसिंगची हत्या करून त्याला फासावर लटकविण्यात आल्याचा आरोप केला. याप्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे. रामसिंगचा खून करण्यात आल्याचा दावा त्याच्या भावाने केला. तो म्हणाला,ङ्कमाझ्या भावाची हत्या करण्यात आली आहे. मला त्याच्या शरीरावर जखमा आणि गळयाभोवती बोटांचे निशाण दिसून आले आहे.ङ्क रामसिंगवर राजस्थानमधील त्याच्या करोली गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

मात्र, तिहार तुरूंगाच्या अधिका-यांनी रामसिंगच्या खूनाचा आरोप फेटाळला आहे. तुरूंगाचे संचालक विमला मेहरा यांनी न्यायालयीन चौकशीत सर्व उत्तरे मिळतील असे म्हटले आहे. सोमवारी रामसिंगला न्यायालयात हजर करण्यात येणार होते. उल्लेखनीय म्हणजे गेल्या १५ महिन्यात तिस-या कैदीने तिहारमध्ये आत्महत्या केली आहे. दरम्यान पीडित मुलीच्या कुटुंबियांनी या घटनेवर आश्चर्य व्यक्त केले आहे. मात्र, ते निराश नाहीत. इतर चार आरोपींना फाशी शिक्षा मिळण्याची ते वाट पाहत आहेत. या आरोपींमध्ये रामसिंगचा भाऊ मुकेशसिंगचाही समावेश आहे.


मंगळवारी एम्समध्ये रामसिंगचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी नेण्यात आला होता. एम्स रूग्णालयातील मॉर्चरी मेडिकल बोर्डने पोस्टमॉर्टम केले. त्यानंतर रामसिंगचा मृतदेह त्याच्या कुटुंबियाकडे सोपवण्यात आला. सोमवारी आवश्यक ती कागदपत्रे देण्यास तुरूंग प्रशासनास अपयश आल्यामुळे रामसिंगच्या मृतदेहाचा पोस्टमॉर्टम करता आला नव्हता.

पत्रकारांवरच भडकल्या जयाप्रदा


लखनौ- एकेकाळच्या प्रसिद्ध अभिनेत्री आणि विद्यमान खासदार जयाप्रदांनी मंगळवारी पत्रकारांशी वाद घालून आपल्या समोरील अडचणीत वाढ केली आहे. त्यांनी कॅमेरासमोरच पत्रकारांना थोबाडीत मारण्याची धमकी दिली. जयाप्रदा कुंडा येथे शहीद झालेले पोलिस अधिकारी जिया उल हक यांची विधवा पत्नी परवीन आझाद यांची भेट घेण्यासाठी देवरिया येथे आल्या होत्या. पत्रकारांनी त्यांना राज्यातील कायदा सुव्यवस्था आणि समाजवादी पक्षाच्या संबंधाबाबत प्रश्न विचारले होते.

त्या म्हणाल्या, अखिलेश यादव यांच्याशी माझे कुठलेही मतभेद नाहीत. ते मला भावासारखे आहेत. पण त्यापूर्वी ते मुख्यमंत्री आहेत. राज्याची कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे.

मात्र, सपाच्या एका प्रश्नावर जयाप्रदा पुरत्या भडकल्या. त्यांनी पत्रकारांना, ङ्कहा कसला प्रश्न आहे. मला पक्षातून काढण्यात आले आहे.ङ्क त्या इतक्यावरच थांबल्या नाहीत. त्यांनी पत्रकारांना उद्देशून, तुम्हाला बुद्धी आहे की नाही, असा उलट प्रश्न विचारून थोबाडीत मारण्याची धमकीच दिली.

रामपूरच्या खासदार असलेल्या जयाप्रदा आणि समाजवादी पक्षाचे माजी महासचिव अमरसिंग यांना २०१० साली पक्षातून काढण्यात आले होते. अमरसिंग आणि जयाप्रदा यांच्याबरोबर अशोक चंदेल, संदीप अग्रवाल, मदन चौहान आणि सर्वेश सिंग पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे काढून टाकण्यात आले होते.

फळांची सालही आहे शरीरासाठी उपयुक्त



अनेकजण फळांची साल काहीच कामाची नाही म्हणत ती फेकून देतात. मात्र, त्यामध्येही भरपूर अँटिऑक्सिडंट आणि पोषक द्रव्ये असतात. तसेच ही साल आरोग्य आणि सौंदर्य वाढवण्यासाठीही फायदेशीर असते. जाणून घेऊया फळांच्या सालीचे फायदे..
संत्रा - संत्र्यामध्ये असलेले फ्लेव्हनॉइड्स कोलेस्टेरॉल कमी करतात. एका अमेरिकन संशोधनानुसार संत्र्याच्या सालीमध्ये ज्यूसच्या तुलनेत २० पट अधिक अँटिऑक्सिडंट्स असतात. केकमध्ये या सालीचा वापर केल्यास चव येते.

पपई - पपईचा गर टाचेवर चोळल्यास भेगा लवकर बर्या होतात. पपईमध्ये भरपूर ‘अङ्क जीवनसत्त्व आणि पापेन नावाचा घटक असतो. यामुळे मृत पेशींपासून मुक्तता मिळते.
डाळिंब - पोटाशी संबंधित विकार झाल्यास डाळिंबाची साल पाण्यात उकळून घ्या. तसेच त्यात दालचिनीचे काही तुकडेही टाका. थंड झाल्यावर हे पाणी प्राशन करा. हे पाणी दररोज तीनवेळा पिल्यास पीडितास फायदा मिळतो.

सफरचंद - सफरचंदाच्या सालीमध्ये अरसोलिक अँसिड नावाचे रसायन असते. त्यामुळे ही साल एवढी चमकदार असते. सालीसह सफरचंदाचे सेवन केल्यास स्नायूंचा विकास होतो आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. सोबतच रक्तातील साखरेचे प्रमाणही नियंत्रित राहते.

केळी - शोच्या झाडांची पाने चमकदार बनवण्यासाठी केळीच्या सालींचा वापर केला जातो. केळीची साल नैसर्गिक कीटकनाशकाचे आणि खताचे कामही करते. जखम झाल्यावर केळीच्या सालीचा मऊ भाग लावल्यास आराम मिळतो.

नाशपाती - या फळाच्या सालीमध्ये भरपूर फायबर आणि जीवनसत्त्वे असतात. यामध्ये असलेल्या क्लोरोझेनिक अँसिड अँटिऑक्सिडंट आणि फ्लोरेटिन नावाच्या फ्लेव्होनॉइडमुळे कँसरग्रस्त पेशी पसरत नाहीत. त्यामुळे या फळाचे भरपूर सेवन केले पाहिजे.

पीच - या फळामध्ये भरपूर पोटॅशियम आणि ‘अङ्क जीवनसत्त्व असते. या फळामुळे त्वचा कोरडी राहते. याच्या सालीत साखरेचे काही दाणे ठेवून चेहर्यावर चोळल्याने त्वचेच्या मृत पेशी हटतात आणि चेहरा उजळतो.

किवी - या फळाच्या सालीमध्ये गराच्या तुलनेत तिप्पट अधिक अँटिऑक्सिडंट्स असतात. तसेच या फळाच्या सालीमुळे अँलर्जी होत नाही आणि प्रतिकारशक्तीही वाढते. हे फळ विषबाधेस जबाबदार असलेल्या स्टेफिलोकोकससारख्या जिवाणूंपासूनही संरक्षण करते.

द्राक्षांमधील चार AMAZING FACTS...



जगात बहुदेक देशात द्राक्षाचे उत्पन्न घेता येते. द्राक्षांचे वेल असतात. द्राक्षाला संस्कृतमध्ये अंगूर, बंगालीत बेदाने अथवा मनेका, गुजरातीमध्ये धराख, फारसीमध्ये अंगूर, इंग्रजीत ग्रेप्स रॅजिन्स तर लॅटीनमध्ये विटिस  विनिफेरा म्हटले जाते. द्राक्षामध्ये ग्लूकोज आणि डेक्स्टड्ढोजच्या मात्रा भरपूर प्रमाणात आढळतात. त्यामुळे शरीरात ऊर्जा उत्पन्न होत असते. द्राक्ष खाल्याने पचनशक्ती वाढते.

जगभरात द्राक्षाची आठ हजार जाती आढळतात. इंग्रजीत ग्रेप्स आणि ग्रेप्स फ्रूट या दोन वेगवेगळ्या जाती आहेत. त्याला ग्रेप्स अंगूर म्हटले जाते. परंतु ग्रेप्स फ्रूट संत्राच्या जातेचे फळ आहे. ग्रेप्स फ्रूट लाल, गुलाबी, निळे, जांभळे आणि पांढर्या रंगाचे असतात. त्यात पॉली फेनोलिक फायटोकेमिकल आढळते. ते एंटी ऑक्सिडेंट आहे. व्हायरल इंफेक्शनवर नियंत्रण मिळवण्यासाठी ग्रेप्स फ्रूट खूप लाभदायी असते.

दीड किलो द्राक्षापासून एक बाटली वाईन तयार केली जाते. ही वाईन सेवन केल्याने भूख वाढते तसेच पचनशक्ती वाढते. शरीरिक थकवा दूर करून रक्त वाढीसाठी फायदेशीर असते. द्राक्षाचा रस सेवन केल्याने मायग्रेनपासून आराम मिळतो. गडद जांभळ्या रंगाचे द्राक्ष पोष्टिक असल्याचे मानले जाते.

द्राक्षात अनेक व्हिटामिन्स आढळतात. पहाटे द्राक्ष खाणे शरीरासाठी लाभदायी असते. किडनी आणि ह्रदय विकारावर द्राक्ष औषधी उपाय आहेत. कोलेस्टड्ढॉल नियंत्रित ठेवण्यासाठी ही द्राक्ष खाणे फायदेशीर असते.
द्राक्षात ८० टक्के पाणी असते. त्यामुळे शरीरातील पाण्याची मात्र नियंत्रित ठेवते.

Sunday, 10 March 2013

युपीएससीच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्रातील खासदारांनी आवाज उठवावा- राज ठाकरे


मुंबई- केंद्रीय लोकसेवा आयोगाने (युपीएससी) मराठीसह इतर प्रादेशिक भाषांना दुय्यम स्थान देऊन मराठी मुलांवर अन्याय केला आहे, त्याविरोधात महाराष्ट्रातील सर्व ४८ खासदारांनी राजकीय मतभेद विसरून एकत्रित आवाज उठवला पाहिजे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमूख राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
मराठीला दूर सारण्याचा हा प्रकार असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. गेल्या काही वर्षांत युपीएससीमध्ये मराठी टक्का वाढल्याने मुद्दामहूनच हे षडयंत्र रचण्यात आले आहे. द्रमुकच्या खासदारांनी याप्रश्नी संसदेत गोंधळ केला. आता महाराष्ट्रातील खासदारांनी एकत्रित येण्याची गरज आहे. मनसेचे आमदार विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणानंतर यासंबंधी प्रश्न विचारतील. मराठी मुलांना मराठीतूनच पेपर सोडवायला मिळाला पाहिजे. यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दबाव आणला पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले.
हिंदी ही राष्ट्रभाषा नाही मग त्यासाठी का आग्रह केला जातोय, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
मातृभाषेतून उत्तरे लिहावयाची असतील तर, एकाच वेळी पदवी परीक्षाही त्याच माध्यमातून दिलेली असणे, तसेच त्या भाषेतून उत्तरे लिहिणारे किमान २५ उमेदवार असणे अशा अटी आयोगाने लादल्या आहेत. हे नियम इंग्रजी अथवा हिंदी ही मातृभाषा असलेल्या उमेदवारांना लागू नाहीत. प्रा. डी.पी अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारशी आयोगाने स्वीकारल्या आहेत. आयोगाच्या या निर्णयावर देशातील अनेक राजकीय पक्षांनी व संघटनांनी टीका करून त्याविरोधात आंदोलन सुरू केले आहे.

भावानेच केला बहिणीचा शिरच्छेद


बहराइच- उत्तर प्रदेशमधील बहराइच जिल्ह्यातील राबीपूर येथे एका भावाने प्रेमविवाहाला विरोध करुन बहिणीचाच शिरच्छेद केला. ताजपूर गावात शनिवारी ही धक्कादायक घटना घडली. बहिणीचे शिर घेऊन त्याने थेट पोलीस ठाणे गाठले. हे पाहून एकच खळबळ उडाली.

ताजपूर गावात जब्बार यांचे कुटुंब राहते. ते अत्यंत गरीब आहेत. जब्बार यांची २० वर्षीय मुलगी महरून आपले लग्न ५० वर्षीय श्रीमंत व्यक्तीशी करणार होती. मात्र, याला भावाचा विरोध होता. तिचा भाऊ ननके हा महरूनचे लग्न तिच्यापेक्षा लहान असलेल्या एका गरीब मुलाबरोबर करण्याचा विचार करीत होता.

भावाचा महरूनच्या लग्नाला विरोध होता. लग्नावरून वाद होत होता. दोन ते तीन दिवस महरून या मुलीला समजवण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. मात्र, ती आपल्या मतावर ठाम होती. अखेर त्याने कुऱ्हाड घेऊन आपल्या बहिणीचे शिर धडावेगळे केले. हत्या करणाऱ्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे. यासंदर्भात वडिलांनी तक्रार दाखल केली आहे.

प्रेयसीची गळा चिरून हत्या


कर्जत - लग्नाची मागणी करणाऱ्या प्रेयसीचा एका तरुणाने गळा चिरून हत्या केल्याची घटना शनिवारी माथेरानमध्येघडली . बिनी अल्फाज बर्नड असे या तरुणाचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे . कांदिवलीतराहणाऱ्या आरती देवराम यंदे हिच्यावर बिनीचे प्रेम होते . आरती त्याला विवाह करण्यास सांगत होती . पण बिनीविवाहित आहे . शनिवारी तो तिला माथेरानला घेऊन आला आणि तिला काळोखी पॉइंटवर नेले व धारधार कटरनेतिच्या मानेवर वार केला आणि पळू लागला . माथेरानमधील एका रहिवाशाने त्याला पकडले .

धर्मनिरपेक्षता म्हणजे "इंडिया फस्र्ट"


वॉशिंग्टन- 'इंडिया फस्र्ट' ही माझी धर्मनिरपेक्षतेची संकल्पना आहे. अतिशय सोपी अशी ही व्याख्या आहे. तुम्ही काहीही करा, भारताला सर्वोच्च प्राथमिकता हवी. कोणताही धर्म आणि विचारधारेपेक्षा देशाला सर्वोच्च स्थान आहे, असे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी ठणकावून सांगितले.

नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी अमेरिकतील भारतीय नागरिकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे संवाद साधला. काही दिवसांपूर्वी व्हार्टन इंडिया इकॉनॉमिक फोरमने मोदी यांना मुख्य वक्ता बनण्याचे निमंत्रण देऊन त्यांचे भाषण रद्द केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून ओवरसीज फ्रेण्ड्स ऑफ बीजेपीने आजच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. एडिसन, न्यूजर्सी, शिकागो आणि इलिनॉयस याठिकाणच्या नागरिकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. मोदींनी यावेळी विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली.

मोदींना धर्मनिरपेक्षतेबाबत विचारण्यात आले. त्यावर ते उत्तरले. माझ्यासाठी धर्मनिरपेक्षतेचा अर्थ आहे इंडिया फस्र्ट. धर्मनिरपेक्षताची व्याख्या अगदी सोपी आहे. तुम्ही कोणतेही काम करा, काहीही करा, भारताचाच विचार सर्वप्रथम आला पाहिजे. देशाच्या भल्याशिवाय इतर कोणतेही ध्येय नको. हे घडले की धर्मनिरपेक्षता आपोआपच तुमच्या रक्तात भिनते.

मोदी म्हणाले की, गुजरातच्या विकासाची जगभरात चर्चा होत आहे. अमेरिकेत मंदी असताना गुजरातमध्ये विकास होत होता. विकास केला की जनता माफ करते. आम्ही चुका केल्या नाहीत, असे नाही. पण विकास झाल्यावर जनता माफ करते, असे मोदी म्हणाले.

मोदींनी आपल्या भाषणात गुजरातच्या विकासाची प्रचंड स्तुती केली. गुजरातमध्ये पर्यटनाचाही मोठा विकास व्हावा, अशी अपेक्षा मोदींनी केली. अमेरिकेतील जनतेला त्यांनी पर्यटनासाठी गुजरातमध्ये यावे, असे आवाहनही केली. मोदींनी भाषणात व्हार्टनबाबतचा उल्लेख टाळला. युपीए सरकारवरही टीका करण्याचे टाळले.

Thursday, 7 March 2013

राजा भैयांविरोधात सीबीआयकडून एफआयआर


लखनौ - पोलिस उप अधीक्षक झिया-उल-हक यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशमधील आमदार रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भैया यांच्याविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) प्रथम दर्शनी अहवाल (एफआयआर) दाखल केले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयने या प्रकरणी आज (गुरुवार) एकूण चार एफआयआर दाखल केले आहेत. बलीपूर गावचे प्रमुख नन्हे यादव आणि त्यांच्या भावाच्या हत्येनंतर झालेल्या हिंसाचारात पोलिस उप अधीक्षक हक यांचा मृत्यू झाला होता.

सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये राजा भैया यांच्यासह ओम श्रीवास्तव, गुलशन यादव, गुड्डू सिंह आणि रोहित सिंह यांची नावे आहेत. त्यामुळे आता सीबीआय राजा भैया यांना चौकशीसाठी ताब्यात घेते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयच्या दहा अधिकाऱ्यांचे पथक आज प्रतापगड जिल्ह्यातील कुंडा येथे आले होते.

हक यांच्या हत्येनंतर त्यांच्या पत्नीने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सीबीआय चौकशीची मागणी मान्य केली होती. तसेच त्यांनी नन्हे यादव यांच्या कुटुंबीयांना मदतीचा धनादेशही दिला आहे.

एफवाय, एसवायचे वेळापत्रक जाहीर करा - मनसे


मुंबई - प्राध्यापकांचे आंदोलन सुरु असताना युवासेना आणि मनसे विघार्थ्यांच्या पाठीशी उभी राहिलीये. तसेच एफवाय, एसवायच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्याचीही मागणी मनसेनं केलीये.

महाविघालयीन परीक्षांसाठी विघापीठानं पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी मनसेनं केलीये.दुसरीकडे विघार्थ्यांच्या प्रॅक्टिकल बंद पाडणा-या प्राध्यापकांवर कारवाईची मागणी युवासेनेनं केलीये. प्राध्यापक अनेक केंद्रांवर प्रॅक्टिकल परीक्षा बंद पाडतायेत. त्यामुळं विघार्थ्यांना मनस्ताप होतोय.

राज्यातल्या ८ विघापीठांमधील प्राध्यापकांनी महाविघालयीन परीक्षांवर टाकलेल्या बहिष्कारामुळं अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्यात. टीवायबीएसस्सीच्या पॅक्टिकलच्या ७७ केंद्रांवर आत्तापर्यंत परीक्षा होऊ शकल्या नाहीत. आज दादरच्या रुपारेल महाविघालयात टीवायबीएसएस्सीची प्रॅक्टीकलही होऊ शकली नाही.

आज एकूण ८४ केंद्रांवर प्रॅक्टिकल परीक्षा होणार आहेत. तर एफवाय आणि एसवायच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्यात. त्यामुळं लाखो महाविघालयीन विघार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झालाय. प्राध्यापकांच्या हेकेखोर वृत्तीमुळं विघार्थी वेठीला धरले जातायेत. त्यामुळं विघार्थ्यांमध्ये संतापाची भावना आहे.

दिल्लीत पुन्हा धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार


नवी दिल्ली- राजधानी दिल्लीत महिलांवरील अत्याचाराचे प्रकार कमी होताना दिसत नाहीये. दिल्लीच्या वेलकम भागात मंगळवारी रात्री २५ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर काळी काच असलेल्या धावत्या कारमध्ये सामुहिक बलात्कार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. इतकेच नव्हे तर गेल्या तीन दिवसांत बलात्काराच्या चार घटना उजेडात आल्या आहेत. यामध्ये एका युवतीबरोबर तीन अल्पवयीन मुली अत्याचाराचे बळी ठरले आहेत.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहार येथे राहणा-या पीडित मुलीचा पतीबरोबर वाद झाल्यापासून ती भजनपुरा भागात एकटी राहत होती. गामडी गावातील यशदेवने तिला नोकरी देण्याच्या बहाण्याने न्यू जाफराबाद पार्क येथे बोलावले. पीडित मुलगी सुमारे सात वाजता तिथे पोहोचली. दोघांनी तिथे काहीवेळ चर्चा केल्यानंतर सोबत असलेल्या तरूणाने तिला थंडपेयात अंमली पदार्थ टाकून ते पिण्यास दिले. पीडित मुलगी बेशुद्ध पडल्यानंतर त्याने तिला कारमध्ये नेले. कारमध्ये आधीपासूनच बसलेल्या तीन लोकांनी आणि त्या तरूणाने पीडित मुलीवर सामुहिक बलात्कार केला. रात्री दोन वाजता पीडित मुलीला एका कचराकूंडीजवळ फेकून ते फरार झाले. पोलिसांनी पीडित मुलीला रूग्णालयात दाखल केले. आणि तिच्या जबाबावरून यशदेव या संशयितास ताब्यात घेतले.

दिल्लीमध्ये गेल्यावर्षीपर्यंत दररोज सरासरी दोन बलात्काराचे गुन्हे नोंद होत होते. यावर्षी दररोज चार तक्रारीची नोंद होत असल्याचा खुलासा राज्यसभेत सादर करण्यात आलेल्या एका अहवालात म्हटले आहे. याप्रकरणातील बहुतांश आरोपी हे पीडितेच्या ओळखीचे असतात, असेही या अहवालात म्हटले आहे.

Wednesday, 6 March 2013

वेब जर्नलिस्ट वेबसाइटचे प्रकाशन


मुंबई - मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वेब जर्नलिजम अभ्यासक्रमाच्या विद्याथ्र्यांसाठी तयार करण्यात आलेल्या www.webjournalist.webs. com या वेबसाइटचे वैशिष्ट्य असे की, यामध्ये मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वेब जर्नलिझम कोर्सची माहिती, ताज्या बातम्या, विविध विषयांवरील माहितीपर विशेष लेख तसेच विद्याथ्र्यांनी लिहिलेले लेख आणि त्यांचे ब्लॉग्जही वाचावयास मिळतात. यात वेब जर्नलिजम म्हणजे काय, त्यासंबंधीची माहिती, निरनिराळ्या वृत्तपत्रांच्या आणि टीव्ही वाहिन्यांच्या वेबसाइट्स, त्यांची विशेषता असे सगळे फिचर्स वेबसाइटच्या पानापानावर पाहायला मिळतील. विविध फोटोंचा समावेश असलेली फोटोगॅलरी आणि व्हिडिओ देखील वेबसाइटवर उपलब्ध आहेत. थोडक्यात म्हणजे, वेब जर्नलिस्ट बनण्याची इच्छा असणारांसाठी अत्यंत उपयुक्त अशी ही वेबसाइट आहे.

सुनील घुमे यांनी सर्व विद्याथ्र्यांना ही वेबसाइट कशी तयार केली, हे अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगितले. सर्वांनी अशाचप्रकारे आपापली वैयक्तिक वेबसाइट बनवावी, असा नवा प्रोजेक्टही त्यांनी यावेळी वेब जर्नलिझमच्या विद्याथ्र्यांना दिला. वेबसाइटच्या लाँचिंगनंतर सर्व विद्याथ्र्यांनी सुनील घुमे आणि प्रमोद चुंचुवार यांच्यासह प्रेस क्लबमध्ये सेलिब्रेशन केले.

- मिनल माळी

Tuesday, 5 March 2013

मनसेच्या १० जणांवर गुन्हा दाखल


साताèयातल्या सैनिकी शाळेत प्रवेश प्रक्रियेत गोंधळ घातल्याप्रकरणी मनसे जिल्हाध्यक्षांसह १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोटे वयाचे दाखल्यांच्या सहाय्यानं साताèयाच्या सैनिकी शाळेत परप्रांतीय विद्यार्थी प्रवेश घेत असल्याचा आरोप करीत मनसे कार्यकत्र्यांनी गोंधळ घातला होता.

वैद्यकीय चाचणीसाठी आलेल्या परप्रांतीय विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना हकलण्यात आलं होतं. त्यावरुन सातारा पोलिसांनी मनसे जिल्हाध्यक्ष रणजीतसिंह भोसले यांच्यासह १० जणांविरोधात मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. साताèयातल्या सैनिकी शाळेत प्रवेश प्रक्रियेत गोंधळ झाल्याने मनसैनिकांनी राडा घातला होता.

मनसैनिकांनी परप्रांतीय विद्यार्थी आणि पालकांना सैनिकी शाळेतून हकलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. वयाचे खोटे दाखले सादर करुन परप्रांतियांचा प्रवेश घेण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप करण्यात येतो आहे.

Monday, 4 March 2013

आरोग्याशी निगडित समस्यांवर घरगुती उपाय


आरोग्याशी निगडित किरकोळ स्वरूपाच्या समस्यांवर घरगुती उपाय केले जातात. स्वयंपाक घरात वापरले जाणारे अनेक पदार्थ यासाठी उपयुक्त ठरतात. नैसर्गिक उपचार पद्धतीचे तज्ज्ञ फिलिप्स विक्स यांच्यानुसार घरगुती उपचाराचा शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता फार कमी असते. त्यामुळे हे उपाय करणे योग्य ठरतात.

पुदिना गुण : पोटदुखी, शौचास साफ न होणे यासारख्या समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त
पोटदुखीवेळी पुदिना तेल गुणकारी ठरते.र्जमनीमधील हॅँडेन्बर्ग विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार तोंडातील फोडांवर आणि उष्णतेच्या उपचारासाठी पुदिन्याचा वापर करता येतो. यात असलेली किटाणू प्रतिरोधक शक्ती संसर्ग टाळण्यासाठी महत्त्वाची ठरते.

तेज पान गुण : किड्यांनी चावले असल्यास किंवा त्वचेवर झालेल्या आजारातील सूज कमी करण्यासाठी उपयुक्त
तेज पत्त्यामध्ये जखम चिघळण्यास विरोध करणारे (अँटिसेप्टिक) गुणधर्म असल्याने प्राचीन काळापासून याचा वापर केला जातो.

ओवा गुण : शरीरातील केमिकलची होणारी हानी टाळण्यासाठी ओवा मदत करतो.
ओव्यात असणारे अँटिऑक्सिडेंटस विविध आजारांपासून बचाव करण्यासाठी सहायक ठरतात. ओव्याचे तेल प्रतिकाररोधकासारखे असून तो स्टेफिलोकोकस नावाच्या जीवाणूंचा नाश करतो. एका अमेरिकन संशोधनानुसार ओव्यात सफरचंदपेक्षा ४२ पट, बटाट्यापेक्षा ३० पट तर संत्र्यापेक्षा १२ पट जास्त अँटिऑक्सिडेंटस असतात.

दालचिनी गुण : घसा दुखणे किंवा इतर समस्या दूर करण्याचे काम दालचिनी करते.
दालचिनीत असणारे अँटिऑक्सिडेंटस घशात संसर्ग निर्माण करणार्या किटाणूंचा नाश करतात. त्याचप्रमाणे या भागातील पेशींना होणारा संसर्गाचा धोका कमी करतात. एक कप पाण्यात दालचिनी टाकून गरम करावे आणि या कोमट पाण्याने चुळा भराव्यात.

तोंडाला चव येईल : चहामध्ये तुळशीची काही पाने टाकावीत. ज्या व्यक्तींच्या तोंडाला चव लागत नाही त्यांनी नियमित हा प्रयोग करावा.

तोंडातील फोडावर उपाय : खडीसाखर आणि कापूर वाटून तोंडातील फोडांवर लावावा. काही दिवसांत आराम मिळतो.

काळे डाग गायब : मेथीची पाने किंवा दाणे पाण्यात भिजवून वाटावीत आणि ही पेस्ट डागांवर लावावीत. थोड्या वेळानंतर कोमट पाण्याने ते साफ करावे.