मुंबई - मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वेब जर्नलिजम अभ्यासक्रमाच्या विद्याथ्र्यांसाठी तयार करण्यात आलेल्या www.webjournalist.webs. com या वेबसाइटचे वैशिष्ट्य असे की, यामध्ये मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वेब जर्नलिझम कोर्सची माहिती, ताज्या बातम्या, विविध विषयांवरील माहितीपर विशेष लेख तसेच विद्याथ्र्यांनी लिहिलेले लेख आणि त्यांचे ब्लॉग्जही वाचावयास मिळतात. यात वेब जर्नलिजम म्हणजे काय, त्यासंबंधीची माहिती, निरनिराळ्या वृत्तपत्रांच्या आणि टीव्ही वाहिन्यांच्या वेबसाइट्स, त्यांची विशेषता असे सगळे फिचर्स वेबसाइटच्या पानापानावर पाहायला मिळतील. विविध फोटोंचा समावेश असलेली फोटोगॅलरी आणि व्हिडिओ देखील वेबसाइटवर उपलब्ध आहेत. थोडक्यात म्हणजे, वेब जर्नलिस्ट बनण्याची इच्छा असणारांसाठी अत्यंत उपयुक्त अशी ही वेबसाइट आहे.
सुनील घुमे यांनी सर्व विद्याथ्र्यांना ही वेबसाइट कशी तयार केली, हे अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगितले. सर्वांनी अशाचप्रकारे आपापली वैयक्तिक वेबसाइट बनवावी, असा नवा प्रोजेक्टही त्यांनी यावेळी वेब जर्नलिझमच्या विद्याथ्र्यांना दिला. वेबसाइटच्या लाँचिंगनंतर सर्व विद्याथ्र्यांनी सुनील घुमे आणि प्रमोद चुंचुवार यांच्यासह प्रेस क्लबमध्ये सेलिब्रेशन केले.
- मिनल माळी
No comments:
Post a Comment