बहराइच- उत्तर प्रदेशमधील बहराइच जिल्ह्यातील राबीपूर येथे एका भावाने प्रेमविवाहाला विरोध करुन बहिणीचाच शिरच्छेद केला. ताजपूर गावात शनिवारी ही धक्कादायक घटना घडली. बहिणीचे शिर घेऊन त्याने थेट पोलीस ठाणे गाठले. हे पाहून एकच खळबळ उडाली.
ताजपूर गावात जब्बार यांचे कुटुंब राहते. ते अत्यंत गरीब आहेत. जब्बार यांची २० वर्षीय मुलगी महरून आपले लग्न ५० वर्षीय श्रीमंत व्यक्तीशी करणार होती. मात्र, याला भावाचा विरोध होता. तिचा भाऊ ननके हा महरूनचे लग्न तिच्यापेक्षा लहान असलेल्या एका गरीब मुलाबरोबर करण्याचा विचार करीत होता.
भावाचा महरूनच्या लग्नाला विरोध होता. लग्नावरून वाद होत होता. दोन ते तीन दिवस महरून या मुलीला समजवण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. मात्र, ती आपल्या मतावर ठाम होती. अखेर त्याने कुऱ्हाड घेऊन आपल्या बहिणीचे शिर धडावेगळे केले. हत्या करणाऱ्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे. यासंदर्भात वडिलांनी तक्रार दाखल केली आहे.

No comments:
Post a Comment