विरार - विरार पूर्वेकडील बिल्डर कुलदीप महादेव चौधरी ( २७ ) यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने मंगळवारी पहाटेत्यांच्या घरासमोर गोळीबार झाल्याची घटना घडली . यात चौधरी बचावले असून त्यांचा एक मित्र जखमी झाला. याप्रकरणी विरार पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
विरार पूर्व मनवेलपाडा रोड , मिटबाववाडी येथील चौधरी यांच्या घरासमोर ही घटना पहाटे दीडच्या सुमारासघडली . कुलदीप आपल्या तीन मित्रांसह चित्रपट पाहून घराजवळ स्कोडा सुपर कारमधून परतले . त्यावेळीदुचाकीवरून आलेल्या चेहरा झाकलेल्या आरोपींनी कुलदीप याच्या दिशेने गोळीबार केला . मात्र कुलदीप चौधरीयांनी कारमधून उडी मारल्याने त्यांना गोळी लागली नाही , मात्र त्यांचा मित्र हरीशंकर बच्चुलाल दुबे जखमीझाला . त्याच्या डाव्या पायावर एक गोळी लागली . त्याच्यावर नालासोपाऱ्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारकरण्यात येत आहेत .
याप्रकरणी मेहुल चोडणकर ( २८ ) व चंदू पाटील या दोघांना विरार पोलिसांनी अटक केली आहे . मेहुल हाकुलदीप चौधरी यांच्या आयरिश ग्रुप ऑफ कंपनीमध्ये कामाला होता . मेहुल याने बुकिंगच्या सुमारे ५० ते ६०लाख रूपयांचा हिशोब ऑफिसच्या रेकॉर्डवर ठेवला नाही , ही रक्कम गहाळ केली व घोटाळा केला असा संशयकुलदीप यांना काही दिवसांपूर्वी आला . चौधरी यांच्या कंपनीतून बाहेर पडलेल्या मेहुल याने स्वत : चे बांधकामव्यवसायाचे कार्यालय सुरू केले होते . यातून दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता.
गेले काही दिवस कुलदीप वमेहुल यांच्यात सुरू असलेल्या वादाचे पर्यावसान या घटनेत झाले आहेत . कंपनीतील पैशाच्या अपहाराचा रागम्हणून काही दिवसांपूर्वी कुलदीप याने आरोपी मेहुल यालाही बॅटने मारले होते , असे सूत्रांनी सांगितले . कुलदीपयांच्या तक्रारीनुसार या आरोपींना अटक करण्यात आले आहे .

No comments:
Post a Comment