Thursday, 14 March 2013

मेथी खाण्याचे हे आहेत चमत्कारिक फायदे


मेथी ही एक अशी भाजी आहे, जी चवीला कडू असली तरी आरोग्याच्या दृष्टीने फार महत्वात्वाची आहे. मेथीचा उपयोग भाजीसाठी तर मेथीच्या दाण्यांचा (मेथ्या) उपयोग मसाला पदार्थांमध्ये होतो. मेथीचे सेवन सर्वजणच करतात, परंतु यामधील औषधी गुणांची माहिती फार कमी लोकांना माहित आहे.

लो-ब्लडप्रेशर - मेथीच्या भाजीत अद्रक, गरम मसाला टाकून खाल्याने लो-ब्लडप्रेशरमध्ये फायदा होतो.

अ‍ॅसिडिटी - ज्या लोकांना अ‍ॅसिडिटीचा त्रास आहे, त्यांनी मेथीच्या रसाचे सेवन करावे. अल्सरचा त्रास असेल तर ताकात मेथी टाकून ते ताक प्यावे. सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे दाणे खाल्याने पोट साफ राहते. मेथीमुळे त्वचेशी संबंधित आजार आणि मलावरोधातून सुटका होते. तसेच यामुळे मेटाबॉलिक रेटही तीव्र होतो.

कोलेस्टड्ढॉल संतुलन - डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मेथी हृदयाचा आजार असणा-या  लोकांसाठी वरदान आहे. मेथीचे नियमित सेवन करून कोलेस्टड्ढॉलचे प्रमाण संतुलित ठेवू शकता. एक ग्लास पाण्यात मेथीचे दाणे रात्रभर भिजवून ठेवावेत आणि सकाळी उठून चावूनचावून खावेत.
डायबेटीस - मेथीमध्ये असलेले भरपूर फायबर आणि स्टेरॉइड दोन पद्धतीने काम करतात. एक म्हणजे शरीरात इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवतात. डायबेटीसच्या रुग्णांसाठी नियमित मेथीचे दाणे खाणे चांगले आहे.

उर्जा वाढते - मेथीमुळे शरीरातील उर्जा वाढते. मेथी दाण्यांमुळे प्रतिकारशक्तीतही वाढ होते. नियमित मेथीचे सेवन करणाऱ्या व्यक्तीला कमजोरी राहत नाही.

थोडी मेथी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. याची पेस्ट तयार करून दुसर्या दिवशी केसांच्या मुळाला लावावी व नंतर साध्या पाण्याने केस धुवावे. यामुळे केस गळणार नाहीत व केसातील कोंडा दूर होईल.

No comments:

Post a Comment