Wednesday, 27 February 2013
भीषण आगीत १८ ठार
कोलकाता - येथील सियालदाह भागात सूर्यसेन बाजाराच्या परिसरातील सहा मजली इमारतीला बुधवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीत १८ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. जखमींना जवळच्या एनआरएस रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे साडेतीनच्या सुमारास ही आग लागली असल्यामुळे घटनेच्या वेळी इमारतीतीतल नागरिक गाढ झोपेत होते. आग लागल्याचे कळताच अग्निशामक दलाच्या २६ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. सकाळी ९ वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात, तसेच १५ जणांना वाचविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. आगीचे नेमके कारण अघाप स्पष्ट होवू शकले नसले तरी सदर भागात प्लास्टिकच्या साहित्याची दुकाने आणि पेपर गोडाऊन असल्याने आग भडकल्याचे सांगण्यात येत आहे.
Monday, 25 February 2013
१५ रुपयांचे तिकीट अघापही १० रूपयांनाच...

मुंबई - रेल्वे बजेट सादर
होणार असतानाच रेल्वे तिकीटासंबंधीत एक खळबळजनक पकार नुकताच उघडकीस आला आहे.
रेल्वे तिकीट दर २२ जानेवारीपासून वाढले असतानादेखील अघापकाही ठिकाणी हे दर लागू
झालेले नसल्याचे पाहावयास मिळते. तिकीट घरांपासून काही अंतरावरच असलेल्या मध्य
रेल्वेच्या स्थानकाबाहेरील अधिकृत तिकीट विक्रेत्यांकडे रेल्वे तिकीटांची विक्री
सुरू असते. हा पकार फार आधीपासूनच सुरू असला तरी, त्यांच्याकडून विकल्या जाणा-या तिकीटांचे दर रेल्वे
तिकीट दरांइतकेच असते. प्रवाशांची वाढती गर्दी आणि त्यांना होणारा त्रास लक्षात
घेवून हे अधिकृत तिकीट विक्रेत्यांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र रेल्वे तिकीट
दर वाढले असतानाही, या
विक्रेत्यांकडे कोणत्याही पकारची वाढ अघापकरण्यात आलेली नाही.
२५ फेब्रुवारी रोजी एका प्रवाशाने ठाणे स्थानकाबाहेरील सिद्धार्थ
टॉवरमधील जगदंबा टड्ढॅव्हल्स या मध्य रेल्वेच्या अधिकृत तिकीट विक्रेत्याकडून ठाणे
ते भायखळा तिकीट खरेदी केले. परंतु ठाणे ते भायखळा रेल्वेचा तिकीट दर १५ रूपये
असतानादेखील १० रूपये व एक रूपया अतिरिक्त भार असे ११ रूपयाचे तिकीट देण्यात आले.
प्रवासादरम्यान जर हे तिकीटतपासणीसाच्या लक्षात आले, तर सरसकट दंड प्रवाशाकडूनच वसूल करण्यात येतो व
प्रवाशालाच नाहक त्रास व भुर्दंड सहन करावा लागतो. अशा अनेक घटना उघडकीस येत आहेत.
रेल्वे तिकीट दर वाढल्यापासून तब्बल एक महिना झाला असूनही या तिकीट विक्रेत्यांना
अघाप जाग आलेली नाही.
ठाणे स्टेशनवर नुकताच असा एक पकार घडला होता. या प्रवाशाकडे
एटीव्हीएम मशीनमधून काढलेले एक तिकीट होते. मात्र एटीव्हीएम मशीनमध्ये बदललेल्या
दराप्रमाणे बदल न केल्यामुळे त्याला पूर्वीच्या तिकीट दराप्रमाणे तिकीट प्राप्त
झाले. दुदैवाने म्हणा किंवा सुदैवाने तो प्रवासी पकडला गेला. त्यानंतर
त्याच्याकडून कमी दराप्रमाणे तिकीट असल्याकारणाने दंडाची मागणी करण्यात आली. परंतु
यात त्याची काहीही चूक नसल्याने त्याने दंड देण्यास नकार दिला व थेट स्टेशन
मास्टरकडे जावून या पकरणाची तक्रार नोंदविली. त्यानंतर टीसींचा दंड आकारण्याचा
पकार उधळून लावतच त्या प्रवाशाने सदर एटीव्हीएम मशीन बंद करायला लावले.
या अधिकृत तिकीट विक्रेत्यांकडे जुन्या दराप्रमाणे मिळणा-या तिकीटांची सर्रास विक्री
होत आहे. यापुढेही असाच पकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग या सर्व
पकाराला जबाबदार कोण? प्रवासी
की, हे मध्य
रेल्वेतर्फे नेमण्यात आलेले अधिकृत तिकीट विक्रेते? याचा खुलासा मध्य रेल्वेने करावा,अशी आशा सध्या रेल्वे
प्रवासी बाळगून आहेत. अशा अनेक तक्रारी मध्य रेल्वेबाबत प्रवासी नेहमीच करीत
असतात. आज रेल्वे अर्थसंकल्पात प्रवाशांना होणा-या अशा तक्रारींबाबत तरी रेल्वे प्रशासन लक्ष
देणार का?
मिनल माळी
महिलांवर होणारे घरगुती हिंसाचार

महिलांवर होणा-या अत्याचारात दिवसागणिक
वाढ होत आहे. आजही विवाहित महिलांचा हुंड्यासाठी सासरची मंडळी मानसिक किंवा
शारीरिक छळ करीत आहेत. त्यात महिलेला धमकविणे, जाळून मारणे, माहेरी
पाठविणे, घरात
कोंडून ठेवणे, मानसिक
त्रास देणे असे प्रकार होत असतात. याच्याविरोधात कितीही आवाज उटवला तरी ही पद्धत
आजपर्यंत बंद झालेली नाही. आजही देशात अनेक ठिकाणी हुंडा पद्धत चालू आहे. त्यामुळे
अनेक महिलांचा नाहक बळी जात आहे. काही महिला त्याविरोधात आवाज उठवतात व हुंडा
मागणाèयांना
धडा शिकवितात. परंतु काही महिला सासरच्यांचे अत्याचार सहन करतात, शेवटी त्यांना मारले जाते किंवा
त्या आत्महत्या करतात. हुंड्याविरोधात अनेक कायदे आहेत. परंतु अनेक जणांना ते
अद्यापही माहित नाहीत. तर काहींना माहित असूनदेखील ते त्याचा उपयोग करीत नाहीत.
या ठिकाणी दोन घटना मला सांगाव्याश्या वाटतात. एक शिक्षित मुलगी लग्न
करून सासरी जाते. काही दिवस व्यवस्थित जातात. परंतु लग्नानंतर काही महिन्यांतच
तिच्यावर हुंड्यासाठी दबाव टाकण्यात येतो. व्यवसायाने डॉक्टर असलेली ती महिला
याच्याविरुद्ध आवाजही उठवू शकली नाही. तिला तिच्या सासरची मंडळी दररोज त्रास देत
असत. तिचा मानसिक छळ करीत असत. परंतु तिने याबद्दल कोणालाही सांगितले नाही.
शेवटी या सर्व त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली. दुस-या घटनेत देखील विवाहित
महिलेचा हुंड्यासाठी छळ होत असतो. परंतु तिच्याही सासरच्या मंडळींना हुंडा मिळत
नाही. याच गोष्टीचा राग मनात धरून सासरच्या मंडळींनी तिला घरातील एका खोलीतच
बांधून जाळून टाकले. दोन्ही घटनांमध्ये महिलेचा मृत्यू झाला. कोणीही याविरोधात
आवाज उठविला नाही qकवा
सासरच्यांविरुद्ध तक्रार नोंदविली नाही.
देशात काही ठिकाणे सोडली तर अनेक राज्यांमध्ये आजही हुंडा घेतला
जातो. काहीजण तर केवळ पैशासाठीच लग्न करतात व लग्नानंतर हुंड्यसाठी महिलेला त्रास
देतात. तिचा मानसिक तसेच शारीरिक छळ करतात. पैसे मिळाले की काही कारणास्तव तिला
सोडून देतात व त्यानंतर दुसरे लग्न करतात. काही ठिकाणी हुंडा म्हणजे एक प्रकारचा
व्यवसायच बनला आहे. यातूनच पुढे स्त्रीभ्रूण हत्येला सुरूवात होते. कारण काही
लोकांना हुंडा घ्यायची माहिती असते, द्यायची नाही. त्यामुळे आपल्या घरात केवळ मुालंनीच जन्म घ्यावा, असा त्यांचा आग्रह असतो. या
सर्व प्रकारात जर महिलेने आवाज उठविला, तर तिच्यावर अत्याचार होतो.
अशा महिलांनी वेळीच आपले आयुष्य सांभाळले पाहिजे. जर आपल्या सासरची
मंडळी हुंड्यासाठी मागणी
करीत असतील, तर तिने
त्यांच्याविरूद्ध पोलिसांत तक्रार नोंदविली पाहिजे. तसेच जर तिचा घरी छळ होत असेल, तर तो सहन न करता
त्याविरूद्धही आवाज उठविला पाहिजे. तसेच जर अत्याचाराची पातळी खूपच वाढली असेल, तर जबरदस्ती आपले आयुष्य
अशा व्यक्तीसोबत न घालवता, योग्य ती
उपाययोजना करणे गरजेचे आहे.
हुंड्याविरोधात भारतीय दंड विधानात अनेक कायदे आहेत. भा.दं.वि. ३०४
बी, ४९८ ए
आदी कायद्यांतर्गत एखादी पीडित महिला तिच्या सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल
करू शकते. लग्नानंतर सात वर्षाच्या आत जर एखाद्या महिलेचा मृत्यू झाला, तर ती हत्या समजण्यात येऊन, ही हत्या हुंड्यासाठी
केल्याचे मानले जाते. त्यामुळे तिच्या पतीला ही हत्या नसून आकस्मिक मृत्यू
असल्याचे त्याच्याबाजूने सिद्ध करावे लागेल. तसे न केल्यास त्याच्यावर हुंड्यासाठी
पत्नीचा खून केल्याप्रकरणी भादंवि ३०४ बी अन्वये गुन्हा दाखल करून कारवाई केली
जाईल. तसेच लग्नानंतर विवाहितेचा तिच्या सासरच्या मंडळींकडून छळ करण्यात आला, तर त्यांच्याविरोधात भादंवि
४९८ ए अन्वये गुन्हा दाखल करण्यात येतो.
असे अनेक कायदे भारतीय दंड विधानात आहेत. महिलांनी ते जाणून घेवून
त्यांचा योग्य वेळी वापर केला पाहिजे. परंतु सर्वच नसल्या तरी काही महिला अशा
देखील असतात, ज्या
पैशासाठी सासरच्यांविरुद्ध खोटी तक्रार दाखल करतात आणि या कायद्यांचा गैरवापर
करतात. या सर्वाचा चुकी नसतानाही सासरच्यांना त्रास सहन करावा लागतो. अशा काही
अपवादात्मक घटना सोडल्या तर, देशात
अनेक ठिकाणी हुंड्यासाठी महिलांवर अत्याचार केला जातो. हे कायदे अशा महिलांसाठी
असून, त्यांनी
न घाबरता या कायद्यांचा वापर करून आपले आयुष्य सुखकर बनविले पाहिजे.
- मिनल
माळी
Friday, 15 February 2013
कालाघोडा फेस्टीव्हल
महाराष्ट्राची राजधानी व देशाची आर्थिक राजधानी असलेली आपली मुंबई.. याच मुंबईचे दर्शन एकाच वेळी जर कुठे घेता येत असेल तर ते आहे कालाघोडा फेस्टीव्हल. या ठिकाणी आपल्याला मुंबईचा खरा चेहरा, तसेच मुंबईकरांची जीवनगाथा पाहावयास मिळते. हे फेस्टीव्हल सीएसटी येथे आठवडाभर चालते. सकाळपासूनच केवळ मुंबईतीलच नव्हे तर जगभरातून लोक या ठिकाणी आलेले असतात. ठिकठिकाणी भरणाèया जत्रांसारखेच निरनिराळ्या दुकानांनी व माणसांच्या गर्दीने भरलेले हे कालाघोडा फेस्टीव्हल असते. परंतु या ठिकाणी केवळ खाऊची, कपड्यांची, खेळण्यांची तसेच इतर वापरण्यातील वस्तूंचीच दुकाने लागत नाहीत, तर इथे निरनिराळ्या थरांतील व क्षेत्रंतील लोक आपली कला सादर करीत असतात. कुणी हातकाम केलेल्या बॅगा, पर्स, बास्केट्स आदी वस्तू बनवून विकतात, तर कुणी मातीपासून बनलेल्या मूर्ती, भांडी आणि अनेक वस्तू आणून विकतात. तसेच महिलांवरील अत्याचार, लैंगिक शोषण, स्त्री भ्रूण हत्या, बलात्कार अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृतीदेखील येथे सादर केल्या जातात. तर असे हे कालाघोडा फेस्टीव्हल सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्र बनले आहे.
कालाघोडा फेस्टीव्हलमध्ये अनेक प्रकारच्या कलाकृती सादर करण्यात आल्या होत्या. प्रवेशद्वारातच टाकाऊपासून टिकाऊचे ज्ञान मिळते. पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, तुटलेल्या माळा, उरलेले धागेदोरे, तुटलेल्या तारांचे रीळ, पत्रे, कागद अशा वस्तू कित्येकजण फेकून देतात. परंतु अशा वस्तूंचा वापर करूनही खूप काही चांगल्या वस्तूंची निर्मिती होऊ शकते, असा संदेश काही कलाकृती प्रवेशद्वारातच देत होत्या. थोडे पुढे जावून ङ्कसिनेमांची शंभरीङ्क इथे आलेल्या लोकांचे लक्ष वेधून घेत होती. निरनिराळे जुन्या, नवीन qहदी व मराठी कलाकारांचे चित्र या ठिकाणी रेखाटलेले होते. अनेकजण प्रत्यक्षात नाही तर त्या चित्रांसोबतच स्वतःचे फोटो काढून त्याचा आनंद घेत होते. परंतु या गर्दीतच कुठेतरी उभी केलेली छोटी-मोठी खतèयाची ‘कवटी‘ कदाचित या असुरक्षित मुंबईतील नागरिकांना सुरक्षित राहण्याचा सल्लाच देत होती जणू. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘मक्खी‘ या चित्रपटाची आठवण करून देणारी एक ‘व्हेस्पा‘ गाडीपासून बनविलेली मक्खीदेखील या ठिकाणी अवतरली होती.
महिलांवर होणारे अत्याचार, बलात्कार, लैंगिक शोषण यावरील अनेक कलाकृती या ठिकाणी उभारण्यात आल्या होत्या. संपूर्ण अंगाला वेगवेगळ्या रंगाची लोकर गुंडाळलेले काही पुतळे उभे होते. मुंबईकरांचे गुंतागुंतीचे आणि ‘बिझी‘ आयुष्य यातून दिसत होते. कुणालाही कुणाकडे पाहण्यास, त्यांचे ऐकायला वेळ नसतो इथे. जो तो आपापल्या कामात व्यस्त. इतक्या गर्दीतूनही एक मोकळी जागा घेतली होती ती ‘वेन नो वन इज लुqकग‘ ने. मुंबईतील धकाधकीच्या जीवनात कोणालाही आपले खाजगी क्षण व्यवस्थितपणे अनुभवता येत नाही, qकवा हवा तसा एकांत मिळतोच असे नाही. त्यावर एक छोटासा उपाय म्हणून हा प्रयत्न असेल. तर या ठिकाणी काळ्या कपड्यांच्या साहाय्याने एक खोली तयार केली होती. त्याच्या आत जावून आपण सार्वजनिक ठिकाणीदेखील खाजगी क्षण अनुभवू शकतो. इथे आलेल्या सर्वांचे पाय अगदी सहजपणे इथे येवून थांबत. थांबणारच. आतमध्ये जाण्यासाठी भली मोठी रांग लागली होती ना. याच ठिकाणी एका कासवाची प्रतिकृती उभारण्यात आली होती. परंतु ते सामान्य कासवाप्रमाणे नक्कीच नव्हते. त्याच्या शेपटीच्या जागी माणसाचा पाय, मागच्या दोन पायांच्या जागी माणसाचे एक कान व एक हात, तसेच पुढील दोन पायांच्या जागी माणसाचे नाक व डोळे असा हा एकूण प्रकार होता. कासव कशाप्रकारे आपल्या अवयवांचा वापर करतो, त्याप्रमाणेच आपणही आपल्या इंद्रियांचा योग्य वापर केला तरच वेळ आली तर कासवाप्रमाणे आपण स्वतःचे रक्षण करू शकतो.पुढे मध्येच एका ठिकाणी इंग्लंडच्या राणीचा हार ठेवण्यात आला होता. खराखुरा हार नाही, तर आपली सर्वांचीच आवडती जागा नरिमन पॉइंट. या जागेची आपल्यासारख्याच लोकांनी केलेली दुर्दशा या ठिकाणी दाखविण्यात आली होती. इथले खडक म्हणजे आपल्याच मालकीची वस्तू असल्यासारखे खडकांवर अनेकांनी नको-नको ते संदेश आणि शिव्या, प्रेमी युगुलांनी आपल्या प्रेमाची साक्ष म्हणून आपली नावं लिहिली होती. ‘सेव्ह स्पॅरो‘ असा संदेश देणारी एक मोठी चिमणी देखील या फेस्टीव्हलमध्ये उभी होती. गर्दीतून कुठूनतरी त्या चिमणीवर सर्वांचे लक्ष जातच होते.
मुंबईचे दर्शन देणाèया या कालाघोडा फेस्टीव्हलमध्ये सर्वांचा मदतनीस, ‘मुंबईचा डबेवाला‘ उभा होताच. त्याला विसरून कसे चालेल. चाकरमान्यांच्या जेवणाची सोय करणारा, त्यांना वेळेकर जेवणाचे डबे घेवून जाणारा डबेवाला अख्ख्या मुंबईचे भार वाहताना दिसत होता. तसेच अनेक छोट्या-छोट्या डब्यांपासून एक मोठा डबादेखील या ठिकाणी बनवून ठेवला होता. इतक्या गर्दीत देखील, उन्हातील चटक्यांपासून वाचण्यासाठी एखादे सावलीचे कृत्रिम झाडदेखील या ठिकाणी बनविण्यात आले होते. अनेकजण या ठिकाणी बसून विश्राम करीत होते. ‘मिटर डाऊन‘ या कलाकृतीने तर सर्वांना वाढत्या महागाईची आठवण करून दिली. गाडी चालवताना फोनवर बोलू नये, हा सरकारचा नियम या फेस्टीवलमध्येही दिसून आला. गाडी चालवताना फोनवर बोलल्यास आपल्या जीवास मुकावे लागेल, अशा प्रकारचा संदेश देणारी एक कबर आणि त्याच्या बाजूला फोन अशी कलाकृती देत होती.कलाकारांची चित्रे असलेल्या, निरनिराळे चांगले संदेश देणाèया अनेक रंगबीरंगी वस्तू (पर्स, हँड बॅग, टी कप, मोठ्या पिशव्या) देखील या ठिकाणी विकण्यासाठी ठेवल्या होत्या. महिलांसाठी तर इथे जन्नतच खाली उतरल्यासारखे वाटत होते. वेगवगळ्या प्रकारच्या गळ्यातील माळा, पर्स, बांगड्या, चप्पल, ड्रेस, साड्या, मेकअपचे साहित्य आदी प्रकारच्या अनेक वस्तू महिलांना स्वतःकडे आकर्षित करीत होत्या. मुलांसाठी देखील कqटग चाय, मुंबई मेरी जान, लोकलचा डब्बा असे अनेक प्रकारचे टी-शर्ट येथे विकण्यासाठी ठेवले होते.
Subscribe to:
Posts (Atom)







