करिअरला प्राधान्य किंवा इतर कारणांमुळे जेव्हा महिलांना वेळाने गर्भधारणा होते. तेव्हा त्यांना काही आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागते. वयाच्या ४० व्या वर्षांच्या दरम्यान गर्भधारणा होणार्या महिलांना तसेच नवजात शिशुला सुद्धा धोका वाढतो.
जास्त कालावधी
२० ते २५ वर्षे वयोगटातील महिलांच्या तुलनेत ३५ पेक्षा जास्त वयाच्या महिलांना गर्भधारणा करताना अनेक समस्या होऊ शकतात. तज्ज्ञांनुसार ३५ वर्षांनंतर महिलांमध्ये गर्भधारणेची शक्यता २० टक्क्यांनी कमी होते. अमेरिकन सोसायटी फॉर रिप्रोडक्टिव्ह मेडिसिननुसार ज्या महिलांना या वयात मासिक समस्येत अनियमितता जाणवते त्यांनी वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार करणे हिताचे ठरेल.
अधिक गुंतागुंती
जास्त वयामध्ये गर्भधारण झाल्याने महिलांना अनेक गुंतागुंतीच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तज्ज्ञानुसार अशावेळी प्लेसेंटा प्रेव्हीया ही समस्या उद्भवू शकते. या स्थितीत प्लेसेंटा आपल्या जागेपासून थोडेसे खाली येते. ज्यामुळे रक्तस्राव होण्याचा धोका वाढतो.
इतर समस्या
गेस्टेशनल डायबिटीज आणि उच्च रक्तदाब सारख्या समस्यांचा धोका जास्त वयाच्या गर्भवतींना अधिक प्रमाणात असतो. कुटुंबात या आजाराचा काही पूर्व इतिहास असल्यास त्याची माहिती डॉक्टरांना द्यावी. वयस्क गर्भवतींनी गर्भावस्थेत योग्य काळजी न घेतल्यास गर्भवती आणि शिशू दोघांनाही धोका वाढतो.
जुळे किंवा तिळे
जास्त वयात फर्टिलिटी कमी झाल्याने ओव्युलेशन इंडक्शनची मदत घेतल्यास जुळे किंवा तिळे होण्याची शक्यता वाढते. एवढेच नाही तर अशाने वेळेआधी प्रसूती होणे किंवा कमकुवत बालक जन्माला येण्याचा सुद्धा धोका असतो.

No comments:
Post a Comment