Friday, 10 May 2013

संजय दत्तला होणार तुरूंगवास , सर्वोच्च न्यायालयाचा दणका

नवी दिल्ली, दि. 10 मे – अभिनेता संजय दत्तच्या शिक्षेवर फेरविचार करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली असून आता 15 मे रोजी त्याला तुरूंगात जावे लागणार आहे.


दरम्यान, 1993 च्‍या बॉम्‍बस्‍फोट प्रकरणी संजय दत्तला अवैध शस्‍त्र बाळगल्‍याच्‍या आरोपात दोषी ठरवून 6 वर्षे तुरुंगात शिक्षा सुनावण्‍यात आली होती. सर्वोच्‍च न्‍यायालयाने संजय दत्तच्‍या शिक्षेतील 1 वर्ष याआधीच कमी केले होते. त्यापैकी त्याने दीड वर्षे यापूर्वी तुरुंगात घालविली आहेत. उरलेल्या साडेतीन वर्षांच्या शिक्षेवर फेरविचार करण्यासाठी त्याने विनंती याचिका दाखल केली होती. परंतु ती शुक्रवारी फेटाळण्‍यात आली. त्‍यामुळे त्‍याला आता उर्वरित साडेतीन वर्षांची शिक्षा भोगावीच लागणार आहे. सर्वोच्‍च न्‍यायालयाने संजय दत्तला शरण येण्‍यासाठी मुदतवाढ दिली असून त्‍याला आता 15 मे रोजी शरण यावे लागणार आहे.

No comments:

Post a Comment