Wednesday, 8 May 2013

केसांच्या पोषणासाठी निवडा योग्य तेल


केसांच्या पोषणासाठी तेल फार महत्त्वाचे असते, पण तेल निवडताना केसाचा प्रकार लक्षात घेतला पाहिजे. केसांच्या प्रकारानुसार त्यांची विटामिन्स आणि खनिज तत्त्वाची गरज बदलत असते. प्रत्येक केसांची गरज वेगवेगळी असते. यासाठी आपल्या केसांना कोणते तेल योग्य आहे हे पाहणे फायद्याचे ठरेल.

सरळ लांब केस : आलमंड ऑइल
ज्या व्यक्तींचे केस सरळ आणि लांब असतात त्यांनी आलमंड ऑइल लावले पाहिजे. हा विटामिन ए,बी,सी आणि ईचा चांगला स्रोत आहे. हे विटामिन दुतोंडी केसांची समस्या कमी करून कोरडेपणा कमी करतो. या तेलामुळे केसांची चमक वाढवण्यास मदत होते. यात असणारे फॅटी अँसिड अल्टा व्हायलेट किरणांपासून केसाचे रक्षण करतात.

विरळ केस : रोजमेरी तेल
ज्यांचे केस विरळ असतात अशांसाठी रोजमेरीचे तेल फायदेशीर ठरते. याच्यामुळे हेअर फोलिकल्समध्ये वाढ होते. केस दाट होण्यासाठी हेअर फोलिकल्स महत्त्वाचे असतात. या तेलात लोह, कॅल्शियम आणि विटामिन बी सारखे पोषक तत्त्व असतात. हे तेल अँटी एंजिग एजंट म्हणून काम करत असते. याच्यामुळे केसांचा रंग आकर्षक होतो तसेच केसात चमक येत केस गळण्याचे प्रमाण कमी होते.

दाट केस : ऑलिव्ह ऑइल
ज्यांचे केस दाट असतात त्यांना डीप कंडिशनिंग करण्याची गरज असते. अशा स्थितीत ऑलिव्ह आइल जास्त फायदेशीर ठरते. या तेलात मोनोसॅच्युरेटेड फॅट असते याच्यामुळे केसांचा रूक्षपणा कमी होतो. त्याचप्रमाणे अंटीऑक्सिडेंट्स आणि ओमेगा-३ फॅटी अँसिडमुळे केसांतील लवचीकपणा वाढतो.

कुरळे केस : अवोकेडो ऑइल
केस रूक्ष आणि गुंता झाल्यामुळे विंचरता येत नाहीत. अशा केसांना किंवा कुरळ्या केसांसाठी अवोकेडो ऑइल (मेक्सिकोत आढळणारी एक प्रकारची वनस्पती) उपयुक्त ठरते. अवोकेडो तेलात प्रोटीन आणि अमिनो अँसिड मोठय़ा प्रमाणात असते. केसांचे बाहेरील आवरणावर असणारी छिद्रे भरण्यासाठी याची मदत होते. याच विटामिन ए,डी,आणि ई मुबलक प्रमाणात असते. आज भारतातील लहान मोठय़ा शहरात हे तेल उपलब्ध आहे.

No comments:

Post a Comment