Wednesday, 8 May 2013

ज्वालामुखीच्या स्फोटात पाच गिर्यारोहक ठार


मनिला, दि. ८ मे - येथील फिलिपिन्समधील ज्वालामुखींपैकी ‘मॅयन’ या ज्वालामुखीचा मंगळवारी पहाटे स्फोट झाल्याने पाच गिर्यारोहकांचा मृत्यू झाला. हा स्फोट सौम्य स्वरूपाचा असला तरी, या स्फोटातून उडालेल्या दगडांमुळे या गिर्यारोहकांचा मृत्यू झाल्याचे फिलिपिन्स इन्स्टिट्यूट ऑफ व्होलकॅनॉलॉजीचे प्रमुख रेनॅटो सोल्डियम यांनी सांगितले. या स्फोटामुळे मध्य फिलिपिन्समध्ये राखेचे ढग जमा झाले होते.

रेनॅटो यांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅयन या ज्वालामुखीचा गेल्या ४०० वर्षांत सुमारे ४० वेळा स्फोट झाला आहे. गिर्यारोहकांच्या या पथकामध्ये आठ गिर्यारोहकांचा समावेश होता. सदर स्फोटानंतर त्यातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला. मृतांची ओळख अघाप पटलेली नाही. तसेच जखमी गिर्यारोहकाला उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले. या स्फोटानंतर कोणताही धोक्याचा इशारा देण्यात आलेला नाही.

No comments:

Post a Comment