मुंबई,
दि. ८ मे - तीन अज्ञात
इसमांनी मिळून एका हमालाची निर्णुण हत्या केल्याची घटना बुधवारी पहाटे सायन
कोहीवाडा येथे घडली. ही हत्या चोरी करण्याच्या उद्देशाने केली गेली असून,
चोरट्यांनी मृत व्यक्तीचा
मोबाईल आणि त्याच्याजवळील सुमारे २६०० रूपयांची रक्कम चोरून नेली. या पकरणी अज्ञात
चाटट्यांविरूद्ध सायन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायन
कोळीवाडा येथे राहणारे केदार पटेल आणि अच्छेलाल निषाद हे दोघेजण पहाटे पाच
वाजण्याच्या सुमारास तेथील गुरूकृपा इमारतीसमोरील रस्त्यावरून जात होते. त्यावेळी
अचानक तिघा अज्ञातांनी त्यांना वाटेत अडवून चाकूच्या धाकाने त्यांच्याजवळील
रक्कमेची मागणी केली. परंतु अच्छालाल यांनी नकार देताच तिघा चोरट्यांपैकी एकाने
अच्छालाल यांच्या छातीत चाकू खूपसला. त्यानंतर अच्छालाल यांचा मोबाईल आणि २६००
रूपयांची रक्कम घेवून तिघे चोर फरार झाले. अच्छालाल यांना उपचारासाठी तेथील
लोकमान्य टिळक रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू
झाला. या पकरणी तीन अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस
त्यांचा शोध घेत आहेत.

No comments:
Post a Comment