मुंबई, दि. 8 मे - भाजप
नेते मधू चव्हाण यांच्यावर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हा
दाखल करण्यात
आला आहे. बलात्काराच्या आरोपानंतर मंगळवारी
सायंकाळी काळाचौकी पोलिस
ठाण्यातील पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. परंतु मधू चव्हाण यांनी सर्व आरोप फेटाळले असून न्यायालयाकडून
न्याय मिळेल, असे त्यांनी सांगितले. मधू चव्हाण यांच्यावर यापूर्वीही शोषणाचे आरोप
लागले आहेत. 2008 मध्ये त्यांची मुंबई भाजप अध्यक्षपदी निवड झाली
त्यावेळी काही महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शोषणाचे आरोप केले होते.

No comments:
Post a Comment