Friday, 15 February 2013

कालाघोडा फेस्टीव्हल


महाराष्ट्राची राजधानी व देशाची आर्थिक राजधानी असलेली आपली मुंबई.. याच मुंबईचे दर्शन एकाच वेळी जर कुठे घेता येत असेल तर ते आहे कालाघोडा फेस्टीव्हल. या ठिकाणी आपल्याला मुंबईचा खरा चेहरा, तसेच मुंबईकरांची जीवनगाथा पाहावयास मिळते. हे फेस्टीव्हल सीएसटी येथे आठवडाभर चालते. सकाळपासूनच केवळ मुंबईतीलच नव्हे तर जगभरातून लोक या ठिकाणी आलेले असतात. ठिकठिकाणी भरणाèया जत्रांसारखेच निरनिराळ्या दुकानांनी व माणसांच्या गर्दीने भरलेले हे कालाघोडा फेस्टीव्हल असते. परंतु या ठिकाणी केवळ खाऊची, कपड्यांची, खेळण्यांची तसेच इतर वापरण्यातील वस्तूंचीच दुकाने लागत नाहीत, तर इथे निरनिराळ्या थरांतील व क्षेत्रंतील लोक आपली कला सादर करीत असतात. कुणी हातकाम केलेल्या बॅगा, पर्स, बास्केट्स आदी वस्तू बनवून विकतात, तर कुणी मातीपासून बनलेल्या मूर्ती, भांडी आणि अनेक वस्तू आणून विकतात. तसेच महिलांवरील अत्याचार, लैंगिक शोषण, स्त्री भ्रूण हत्या, बलात्कार अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृतीदेखील येथे सादर केल्या जातात. तर असे हे कालाघोडा फेस्टीव्हल सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्र बनले आहे.


कालाघोडा फेस्टीव्हलमध्ये अनेक प्रकारच्या कलाकृती सादर करण्यात आल्या होत्या. प्रवेशद्वारातच टाकाऊपासून टिकाऊचे ज्ञान मिळते. पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, तुटलेल्या माळा, उरलेले धागेदोरे, तुटलेल्या तारांचे रीळ, पत्रे, कागद अशा वस्तू कित्येकजण फेकून देतात. परंतु अशा वस्तूंचा वापर करूनही खूप काही चांगल्या वस्तूंची निर्मिती होऊ शकते, असा संदेश काही कलाकृती प्रवेशद्वारातच देत होत्या. थोडे पुढे जावून ङ्कसिनेमांची शंभरीङ्क इथे आलेल्या लोकांचे लक्ष वेधून घेत होती. निरनिराळे जुन्या, नवीन qहदी व मराठी कलाकारांचे चित्र या ठिकाणी रेखाटलेले होते. अनेकजण प्रत्यक्षात नाही तर त्या चित्रांसोबतच स्वतःचे फोटो काढून त्याचा आनंद घेत होते. परंतु या गर्दीतच कुठेतरी उभी केलेली छोटी-मोठी खतèयाची ‘कवटी‘ कदाचित या असुरक्षित मुंबईतील नागरिकांना सुरक्षित राहण्याचा सल्लाच देत होती जणू. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘मक्खी‘ या चित्रपटाची आठवण करून देणारी एक ‘व्हेस्पा‘ गाडीपासून बनविलेली मक्खीदेखील या ठिकाणी अवतरली होती.

एक-दोन रूपयांच्या नाण्यांनी सजवलेली कारदेखील सर्वांचे अगदी सहजपणे लक्ष वेधून घेत होती. जाड पुठ्ठ्यांपासून, रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्यांपासून बनविलेल्या बाकड्यांचा वापर अनेकजण आरामासाठी करीत होते. कदाचित आपल्या कलेतून लोकांना समाधान मिळावे, या उद्देशानेच ते त्या ठिकाणी ठेवले असतील. असे मला काटते.


महिलांवर होणारे अत्याचार, बलात्कार, लैंगिक शोषण यावरील अनेक कलाकृती या ठिकाणी उभारण्यात आल्या होत्या. संपूर्ण अंगाला वेगवेगळ्या रंगाची लोकर गुंडाळलेले काही पुतळे उभे होते. मुंबईकरांचे गुंतागुंतीचे आणि ‘बिझी‘ आयुष्य यातून दिसत होते. कुणालाही कुणाकडे पाहण्यास, त्यांचे ऐकायला वेळ नसतो इथे. जो तो आपापल्या कामात व्यस्त. इतक्या गर्दीतूनही एक मोकळी जागा घेतली होती ती ‘वेन नो वन इज लुqकग‘ ने. मुंबईतील धकाधकीच्या जीवनात कोणालाही आपले खाजगी क्षण व्यवस्थितपणे अनुभवता येत नाही, qकवा हवा तसा एकांत मिळतोच असे नाही. त्यावर एक छोटासा उपाय म्हणून हा प्रयत्न असेल. तर या ठिकाणी काळ्या कपड्यांच्या साहाय्याने एक खोली तयार केली होती. त्याच्या आत जावून आपण सार्वजनिक ठिकाणीदेखील खाजगी क्षण अनुभवू शकतो. इथे आलेल्या सर्वांचे पाय अगदी सहजपणे इथे येवून थांबत. थांबणारच. आतमध्ये जाण्यासाठी भली मोठी रांग लागली होती ना. याच ठिकाणी एका कासवाची प्रतिकृती उभारण्यात आली होती. परंतु ते सामान्य कासवाप्रमाणे नक्कीच नव्हते. त्याच्या शेपटीच्या जागी माणसाचा पाय, मागच्या दोन पायांच्या जागी माणसाचे एक कान व एक हात, तसेच पुढील दोन पायांच्या जागी माणसाचे नाक व डोळे असा हा एकूण प्रकार होता. कासव कशाप्रकारे आपल्या अवयवांचा वापर करतो, त्याप्रमाणेच आपणही आपल्या इंद्रियांचा योग्य वापर केला तरच वेळ आली तर कासवाप्रमाणे आपण स्वतःचे रक्षण करू शकतो.



पुढे मध्येच एका ठिकाणी इंग्लंडच्या राणीचा हार ठेवण्यात आला होता. खराखुरा हार नाही, तर आपली सर्वांचीच आवडती जागा नरिमन पॉइंट. या जागेची आपल्यासारख्याच लोकांनी केलेली दुर्दशा या ठिकाणी दाखविण्यात आली होती. इथले खडक म्हणजे आपल्याच मालकीची वस्तू असल्यासारखे खडकांवर अनेकांनी नको-नको ते संदेश आणि शिव्या, प्रेमी युगुलांनी आपल्या प्रेमाची साक्ष म्हणून आपली नावं लिहिली होती. ‘सेव्ह स्पॅरो‘ असा संदेश देणारी एक मोठी चिमणी देखील या फेस्टीव्हलमध्ये उभी होती. गर्दीतून कुठूनतरी त्या चिमणीवर सर्वांचे लक्ष जातच होते.

मुंबईचे दर्शन देणाèया या कालाघोडा फेस्टीव्हलमध्ये सर्वांचा मदतनीस, ‘मुंबईचा डबेवाला‘ उभा होताच. त्याला विसरून कसे चालेल. चाकरमान्यांच्या जेवणाची सोय करणारा, त्यांना वेळेकर जेवणाचे डबे घेवून जाणारा डबेवाला अख्ख्या मुंबईचे भार वाहताना दिसत होता. तसेच अनेक छोट्या-छोट्या डब्यांपासून एक मोठा डबादेखील या ठिकाणी बनवून ठेवला होता. इतक्या गर्दीत देखील, उन्हातील चटक्यांपासून वाचण्यासाठी एखादे सावलीचे कृत्रिम झाडदेखील या ठिकाणी बनविण्यात आले होते. अनेकजण या ठिकाणी बसून विश्राम करीत होते. ‘मिटर डाऊन‘ या कलाकृतीने तर सर्वांना वाढत्या महागाईची आठवण करून दिली. गाडी चालवताना फोनवर बोलू नये, हा सरकारचा नियम या फेस्टीवलमध्येही दिसून आला. गाडी चालवताना फोनवर बोलल्यास आपल्या जीवास मुकावे लागेल, अशा प्रकारचा संदेश देणारी एक कबर आणि त्याच्या बाजूला फोन अशी कलाकृती देत होती.

कलाकारांची चित्रे असलेल्या, निरनिराळे चांगले संदेश देणाèया अनेक रंगबीरंगी वस्तू (पर्स, हँड बॅग, टी कप, मोठ्या पिशव्या) देखील या ठिकाणी विकण्यासाठी ठेवल्या होत्या. महिलांसाठी तर इथे जन्नतच खाली उतरल्यासारखे वाटत होते. वेगवगळ्या प्रकारच्या गळ्यातील माळा, पर्स, बांगड्या, चप्पल, ड्रेस, साड्या, मेकअपचे साहित्य आदी प्रकारच्या अनेक वस्तू महिलांना स्वतःकडे आकर्षित करीत होत्या. मुलांसाठी देखील कqटग चाय, मुंबई मेरी जान, लोकलचा डब्बा असे अनेक प्रकारचे टी-शर्ट येथे विकण्यासाठी ठेवले होते.

1 comment: