Friday, 25 January 2013

भारत४इंडिया - १९ जानेवारी



सर्वजण वाशी येथे भारत४इंडिया या वेबसाईटच्या ऑफिसमध्ये एकत्र आले होते. मंदार फणसे हे या वेबसाईटचे प्रमुख आहेत. ही वेबसाईट अन्य वेबसाईट्सपेक्षा फार वेगळी आहे. त्याची एकंदर संकल्पना, डिझायqनग आणि इतर सर्वच खूप भिन्न आहे. भारत४इंडिया या नावातूनच सर्व अर्थ समजतो. इतर चॅनल्सच्या वा वृत्तपत्राच्या वेबसाईट्स यात खूप शहरीकरण आणि मनोरंजन मसाला भरलेला दिसतो. परंतु भारत४इंडिया या वेबसाईटचा संपूर्ण कल राज्यातील गावांकडे आहे. त्यांची ही कल्पना मला फार आवडली. इतर ठिकाणी जे दाखवित नाहीत qकवा तुलनेने क्वचितच दाखवतात, ते भारत४इंडिया दाखवते.

आज मुंबईत वा राज्यभरातील अनेक विविध शहरांमध्ये वा गावांमध्ये असे पुष्कळ लोक आहेत, ज्यांना राज्यातील प्रत्येक गावातील संस्कृती, कला, सण आदी गोष्टी माहिती नसतात. काहींना केवळ आपल्याच गावातील माहिती असते, तर काहींना तीदेखील नसते. अशा लोकांपर्यंत प्रत्येक गावातील छोटी-मोठी माहिती, चांगल्या-वाईट बाबी पोहोचविण्याचे उत्तम काम भारत४इंडिया ही वेबसाईट करीत आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आदी प्रदेशांतील गावांमध्ये कोणकोणते सण साजरे केले जातात, त्यावेळी काय काय गंमतीजमती होतात, तेथील लोकांना हे साजरे करण्यासाठी काय अडचणी येतात, तिकडे काय पिकते, तेथील लोक कोणत्या प्रकारची कामे करून आपले पोट भरतात, दुष्काळाच्या परिस्थितीत देखील आपले आयुष्य आनंदात कसे जगतात ही सगळी माहिती हवी असेल, तर भारत४इंडिया ही वेबसाईट अत्यंत उपयुक्त आहे.

या वेबसाईटच्या डिझायqनगबद्दल म्हणायचे झाले तर, अतिशय उत्तम डिझायqनग केलेले आहे. मुख्य पृष्ठावर स्पेशल रिपोर्ट, विशेष लेख, व्हिडिओ, ब्लॉग असे वेगवेगळे पर्याय दाखविले आहेत. भारत४इंडिया या वेबसाईटने अंध व्यक्तींचा विचार करून प्रत्येक बातमी अथवा लेखासोबत त्याचा व्हिडिओ जोडलेला आहे. ही कल्पना मला फार आवडली. तसेच प्रत्येक व्यक्तीला आपल्या गावात काय घडते हे सांगण्याची उत्सुकता असते, परंतु कुठे सांगायचे यासाठीत्याला काही पर्याय नसतो. परंतु भारत४इंडियाने हा पर्याय त्याला उपलब्ध करून दिला आहे. आज गावागावातील प्रत्येक व्यक्ती त्याच्या गावाबद्दल चांगल्या गोष्टी, समस्या अगदी बिनधास्तपणे या वेबसाईटवर टाकू शकतो. हेही मला फार आवडले.

ही वेबसाईट अशा प्रकारे जोमाने काम करीत राहिली तर एक दिवस अन्य वेबसाईट्सपेक्षाही पुढे जाऊ शकते, याची मला खात्री आहे. माझ्या कौशल्याचा आणि थोड्याफार ज्ञानाचा या वेबसाईटसाठी काही उपयोग होऊ शकला तर मला नक्की आनंद होईल.

मिनल माळी

No comments:

Post a Comment