Wednesday, 27 February 2013

भीषण आगीत १८ ठार


कोलकाता - येथील सियालदाह भागात सूर्यसेन बाजाराच्या परिसरातील सहा मजली इमारतीला बुधवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीत १८ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. जखमींना जवळच्या एनआरएस रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे साडेतीनच्या सुमारास ही आग लागली असल्यामुळे घटनेच्या वेळी इमारतीतीतल नागरिक गाढ झोपेत होते. आग लागल्याचे कळताच अग्निशामक दलाच्या २६ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. सकाळी ९ वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात, तसेच १५ जणांना वाचविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. आगीचे नेमके कारण अघाप स्पष्ट होवू शकले नसले तरी सदर भागात प्लास्टिकच्या साहित्याची दुकाने आणि पेपर गोडाऊन असल्याने आग भडकल्याचे सांगण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment