
मुंबई - रेल्वे बजेट सादर
होणार असतानाच रेल्वे तिकीटासंबंधीत एक खळबळजनक पकार नुकताच उघडकीस आला आहे.
रेल्वे तिकीट दर २२ जानेवारीपासून वाढले असतानादेखील अघापकाही ठिकाणी हे दर लागू
झालेले नसल्याचे पाहावयास मिळते. तिकीट घरांपासून काही अंतरावरच असलेल्या मध्य
रेल्वेच्या स्थानकाबाहेरील अधिकृत तिकीट विक्रेत्यांकडे रेल्वे तिकीटांची विक्री
सुरू असते. हा पकार फार आधीपासूनच सुरू असला तरी, त्यांच्याकडून विकल्या जाणा-या तिकीटांचे दर रेल्वे
तिकीट दरांइतकेच असते. प्रवाशांची वाढती गर्दी आणि त्यांना होणारा त्रास लक्षात
घेवून हे अधिकृत तिकीट विक्रेत्यांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र रेल्वे तिकीट
दर वाढले असतानाही, या
विक्रेत्यांकडे कोणत्याही पकारची वाढ अघापकरण्यात आलेली नाही.
२५ फेब्रुवारी रोजी एका प्रवाशाने ठाणे स्थानकाबाहेरील सिद्धार्थ
टॉवरमधील जगदंबा टड्ढॅव्हल्स या मध्य रेल्वेच्या अधिकृत तिकीट विक्रेत्याकडून ठाणे
ते भायखळा तिकीट खरेदी केले. परंतु ठाणे ते भायखळा रेल्वेचा तिकीट दर १५ रूपये
असतानादेखील १० रूपये व एक रूपया अतिरिक्त भार असे ११ रूपयाचे तिकीट देण्यात आले.
प्रवासादरम्यान जर हे तिकीटतपासणीसाच्या लक्षात आले, तर सरसकट दंड प्रवाशाकडूनच वसूल करण्यात येतो व
प्रवाशालाच नाहक त्रास व भुर्दंड सहन करावा लागतो. अशा अनेक घटना उघडकीस येत आहेत.
रेल्वे तिकीट दर वाढल्यापासून तब्बल एक महिना झाला असूनही या तिकीट विक्रेत्यांना
अघाप जाग आलेली नाही.
ठाणे स्टेशनवर नुकताच असा एक पकार घडला होता. या प्रवाशाकडे
एटीव्हीएम मशीनमधून काढलेले एक तिकीट होते. मात्र एटीव्हीएम मशीनमध्ये बदललेल्या
दराप्रमाणे बदल न केल्यामुळे त्याला पूर्वीच्या तिकीट दराप्रमाणे तिकीट प्राप्त
झाले. दुदैवाने म्हणा किंवा सुदैवाने तो प्रवासी पकडला गेला. त्यानंतर
त्याच्याकडून कमी दराप्रमाणे तिकीट असल्याकारणाने दंडाची मागणी करण्यात आली. परंतु
यात त्याची काहीही चूक नसल्याने त्याने दंड देण्यास नकार दिला व थेट स्टेशन
मास्टरकडे जावून या पकरणाची तक्रार नोंदविली. त्यानंतर टीसींचा दंड आकारण्याचा
पकार उधळून लावतच त्या प्रवाशाने सदर एटीव्हीएम मशीन बंद करायला लावले.
या अधिकृत तिकीट विक्रेत्यांकडे जुन्या दराप्रमाणे मिळणा-या तिकीटांची सर्रास विक्री
होत आहे. यापुढेही असाच पकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग या सर्व
पकाराला जबाबदार कोण? प्रवासी
की, हे मध्य
रेल्वेतर्फे नेमण्यात आलेले अधिकृत तिकीट विक्रेते? याचा खुलासा मध्य रेल्वेने करावा,अशी आशा सध्या रेल्वे
प्रवासी बाळगून आहेत. अशा अनेक तक्रारी मध्य रेल्वेबाबत प्रवासी नेहमीच करीत
असतात. आज रेल्वे अर्थसंकल्पात प्रवाशांना होणा-या अशा तक्रारींबाबत तरी रेल्वे प्रशासन लक्ष
देणार का?
मिनल माळी
No comments:
Post a Comment