बांग्लादेशी नागरिक पोलिसांच्या रडारवर
वसई, (प्रतिनिधी) : मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने ठाणे ग्रामीण क्षेत्रांतून शेकडो बांग्लादेशींची धरपकड केल्यानंतर वसई पोलिसांनी देखील आपल्या हद्दीत कसून शोध घेऊन चार बांग्लादेशी नागरिकांना आज अटक केली आहे. वसई विरार परिसरात बांग्लादेशींचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
वसई पोलिस ठाणे हद्दीतील वसई कोळीवाडा मस्जिदच्या पाठीमागे मोकळ्या जागेत पत्र्याच्या शेडमध्ये काही परदेशी नागरिक वास्तव्यास असल्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास वसई पोलिसांच्या टीमने या ठिकाणी छापेमारी करुन चार जणांना अटक केली.
१२-१२.३५
No comments:
Post a Comment