Tuesday, 11 December 2012

मनपा कर्मचाèयांच्या गाड्यांवर हल्ला

मुंबई, (वृत्तसंस्था) : वरळी येथील अ‍ॅनी बेझंट रोडवर काही अज्ञात लोकांनी मनपाच्या गाड्या आणि सुरक्षा रक्षकांच्या चौकीची तोडफोड केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. तोडफोडसोबतच त्यांनी मनपा कर्मचाèयांना मारहाणदेखील करण्यात आली.

काही अज्ञातां लोकांचा जमाव अचानकपणे महापालिकेच्या यानगृहात पोहोचला. त्यानंतर तेथे मनपाच्या गाड्यांची व सुरक्षा रक्षकांच्या चौकीची तोडफोड केली. तसेच मनपा कर्मचाèयांना मारहाण केली. त्यानंतर वरळीतीलच लव्हग्रो पम्पिंग स्टेशनजवळील सुरक्षा रक्षकांच्या चौकीची तोडफोड केली. तोडफोड करणाèयांबद्दल आपणास काहीही माहिती नसल्याचे मनपा कर्मचाèयांचे म्हणणे आहे.

मिनल माळी

No comments:

Post a Comment