मुंबई, (वृत्तसंस्था) : एका इसमाने आपली पत्नी समजून दुसèयाच महिलेवर चाकूचा हल्ला केल्याची घटना दादर पूर्वेकडील स्वामी नारायण मंदिराजवळ सोमवारी सकाळी घडली. सदर जखमी महिलेला त्वरित सायन रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या घटनेनंतर दादर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
येथील नेहमी गजबजलेल्या दादर येथे सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास एका इसमाने एका महिलेवर अचानक चाकूचा वार केला. ही घटना घडताच आजूबाजूच्या नागरिकांनी आरडाओरड सुरू केली. पोलिस स्टेशन जवळच असल्याने पोलिसांनी लगेचच Ÿआरोपीस अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या पत्नीने घरगुती qहसाचाराबद्दल त्याच्याविरूद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानंतर काही दिवस तो पोलिस कोठडीत होता. याच गोष्टीचा राग मनात धरून त्याचा बदला घेण्यासाठी त्याने आपल्या पत्नीला संपवायचा कट रचला. त्यानुसार त्याने सकाळी ऑफिसला जाताना पत्नीला मारायचे ठरविले. परंतु गर्दीमुळे आपली पत्नी ओळखता न आल्याने त्याने चुकून दुसèयाच महिलेवर वार केला. सदर जखमी महिलेला सायन रूग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
मिनल माळी
झी २४ तास आणि दिव्य मराठी

No comments:
Post a Comment