Saturday, 25 August 2012

Gutkha & Sigret


तंबाखू, गुटखा यांच्यासारख्या पदारथांवर सरकारने बंदी घातली असून देखील काही ठिकाणी अजूनही गुटखा, सिगारेट यांसारखे पदार्थ विकले जात आहेत. या सर्वांना केवळ जनताच नाही, तर सरकारसुद्धा जबाबदार आहे. अशा प्रकारच्या पदार्थांच्या विक्रीवर जर सरकारने अत्यंत कडक अशी शिक्षा ठेवली, तर कोणीही त्या पदार्थांचा विचारसुद्धा करणार नाही.

अजूनही प्रत्येक पानाच्या ठेल्यावर सर्रास तंबाखू आणि सिगारेट यांची विक्री होत आहे. मी अनेक अशी दुकाने पहिली आहेत. विकणारा विकत आहे, मग विकत घेणारा का नाही घेणार ? सर्वात महत्वाचे, सरकारने जर अशा पदार्थांचे उत्पादनच थांबवले तर.... तर कोणताही दुकानदार ते विकूच शकणार नाही. त्यांच्यामुळे सामान्य जनतेला किती त्रास होतो याचा कोणीच विचार करत नाही. आज सरळपणे अगदी शिक्षित व्यक्तीसुद्धा सिगरेट पिताना दिसतो. पण त्याच्या सिगरेटच्या धुरामुळे बाकीच्या लोकांना त्रास होत आहे, याचा तो जराही विचार करत नाही.

माझ्या मते तर, अशा लोकांसाठी एकाच शिक्षा योग्य आहे.
१. जर कोणी पानवाला आपल्या दुकानावर अशा प्रकारचे पदार्थ विकताना दिसला, तर जो कोणी त्याला बघेल त्याने हक्काने त्याच्याकडून शिक्षेचे पैसे घ्यावेत. असा नियमच बनवायला पाहिजे सरकारने.
२. तसेच पिणाऱ्याच्या पण बाबतीत करायला पाहिजे. जेणे करून त्यांना अकाल येईल की आपण जे करतोय त्यामुळे आपणाला शारीरिक तसेच आता आर्थिकसुद्धा नुकसान होत आहे. मग तो पिणे हि हळूहळू थांबवेल.

हे सर्व लगेच तर होणार नही, पण एक दिवस हा महाराष्ट्र तसेच संपूर्ण भारत देश व्यसन मुक्त होईल.

धन्यवाद...
मिनल माळी.

No comments:

Post a Comment