पुरूषांप्रमाणेच महिलांनाही कामानिमित्त रात्री-अपरात्री घराबाहेर पडावे लागते. दिल्लीमध्ये २३ वर्षीय महिलेवर झालेल्या बलात्कारामुळे संपूर्ण देशभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी होत असतानाही त्यांच्यावर कडक कारवाई केली जात नाही. त्यामुळे अशाच प्रकारचे अनेक गुन्हे देशभरात सर्वत्र आजही सर्रास घडत आहेत. आरोपींच्या मनात भीती नावाची गोष्टच उरलेली नाही. अशा परिस्थितीत महिलांनी घराबाहेर पडावे की नाही हा प्रश्न उपस्थित झाला आहे. परंतु काळाची गरज आणि आताची सुधरित पिढी पाहता, पुरूषांप्रमाणेच महिलांनाही नोकरीकरिता बाहेर जावे लागते. परंतु राजधानी दिल्लीमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर आणि त्यानंतर राज्यभरात सलग घडलेल्या बलात्काराच्या घटनांनंतर देशाची आर्थिक राजधानी मानल्या जाणाèया मुंबईत महिला सुरक्षित आहेत का, असा प्रश्न पडला आहे.
ङ्कआमची मुंबई, सुरक्षित मुंबईङ्क असे आपण म्हणतो. परंतु बलात्काराच्या एकामागून एक घडणाèया भयानक घटनांनंतर आमची मुंबई सुरक्षित आहे का ? तरूण मुली, महिला घराबाहेर रात्री उशिरापर्यंत फिरू शकतात का ? इतकेच नव्हे तर त्या आपल्या स्वतःच्या घरात सुरक्षित आहेत का ? असे अनेक प्रश्न उपस्थित राहिले आहेत.
या प्रकरणांमधून मला माझ्या आयुष्यातील काही प्रसंग शेअर करावेसे वाटत आहेत. मी परेल विभागत गेली १४ वर्षे राहत आहे. इतक्या वर्षांत मला या विभागत अशा प्रकारच्या कोणत्याच समस्या उद्भवल्या नाहीत. कारण परेल विभाग हे माझ्या दृष्टीने अतिशय सुरक्षित आहे. कारण या विभागत रात्री १२ वाजेपर्यंतही वर्दळ सुरू असते. त्यामुळे मी माझ्या विभागात रात्री १२ वाजेपर्यंतदेखील अगदी बिनधास्त फिरू शकत होते. परंतु दिल्लीमध्ये घडलेल्या बलात्कार प्रकरणामुळे माझे पालक मला रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहू देत नाही. मी ज्या ठिकाणी काम करीत होते, तेथून घरी येण्यास उशिर होत असल्याकारणाने मला ती नोकरी सोडावी लागली. तसेच काही काळानंतर मला दुसरीकडे नोकरी मिळाली, परंतु तिकडेही रात्री उशीर होणार असल्यामुळे, पालकांच्या सांगण्यानुसार मला ते काम नाकारावे लागले. इतके वर्ष अगदी बिनधास्त कुठेही फिरू शकत असणारी मी, आज घराबाहेर पडताना माझ्या पालकांच्या मनात भीती निर्माण होते. हा नक्कीच आजकाल घडणाèया बलात्काराच्या आणि खुनाच्या प्रकरणांमुळे होत आहे, असे मला वाटते.
माझ्या आयुष्यात इतक्या वर्षांमध्ये कधीही अशा प्रकारची घटना माझ्या आजूबाजूला घडलेली मी पाहिली नाही. परंतु मी एक पत्रकार असल्यामुळे अशा प्रकारच्या अनेक घटना माझ्या डोळ्यांसमोरून गेल्या आहेत. भार्इंदरमध्ये काही महिन्यांपूर्वी एका तरूणाने आपल्याच प्रेयसीवर बलात्कार करून तिची गळा दाबून हत्या केल्याची घटना घडली होती. ठाण्यामध्येही एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अनेकदा बलात्कार करून तो इसम पळून गेल्याची घटना घडली होती. अशा प्रकारच्या अनेक घटना मला माहिती आहेत. नागपूरमध्ये तर चक्क वडिलांनीच स्वतःच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली होती. तसेच पुण्यात एका दीड वर्षाच्या मुलीवर तिच्याच मामाने बलात्कार केल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घडला नुकतीच घडली होती.
टीव्हीवर अशा प्रकारच्या अनेक घटना मी पाहते. दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेश, कोलकाता, हैदराबाद अशा मोठमोठ्या शहरांमध्ये अशा प्रकारचे गुन्हे मोठ्या प्रमाणात होत असतात. त्यामुळे मनात कुठेतरी भीती असते. उद्या आपल्यासोबतही अशी घटना घडेल याची नाही, तर इतक्या घटना घडूनदेखील प्रशासन या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करत नाही. त्यामुळे काही वर्षांनंतर आपल्या मुंबईचे, राज्याचे तसेच देशाचे काय होईल, अशी भीती मनात नेहमी असते. आतातरी सरकारने असे गुन्हे करणाèयांवर कठोर शिक्षा करावी, जेणेकरून असे गुन्हे करताना कोणताही व्यक्ती किमान १० वेळा विचार करेल.
केवळ काही वर्षे कारावासाची शिक्षा अशा आरोपींना दिली जाते. परंतु ज्या तरूणीवर वा महिलेवर अत्याचार होतात, ती प्रत्येक क्षणाला मरत असते. तिचा कोणीच विचार करत नाही. आरोपीची शिक्षा पूर्ण झाल्यावर सगळेच नसतील तरी काही आरोपी पुन्हा त्याच वाटेला जातात आणि असे गुन्हे पुन्हा करतात. मला तरी वाटते की अशा आरोपींना अशी शिक्षा करावी, ज्यानंतर त्यांनी मनात आणले तरी अशा प्रकारचे गुन्हे त्यांना करता येणार नाहीत. बलात्कार करणाèया आरोपींचे हात, पाय तोडून तसेच त्यांचे दोन्ही डोळे फोडून, त्यांना अनोळख्या शहरात रस्त्यावर फेकून द्यावे. जेणेकरून त्यांना क्षणाक्षणाला मरण मागावे लागेल आणि आपण ज्या मुलीवर बलात्कार केला तिची काय अवस्था झाली असेल, याची त्यांना कल्पना येईल. qकवा अशा आरोपींना सरळ नपुंसक करावे, जेणेकरून त्यांनी ठरवले तरी पुन्हा ते आयुष्यात अशा प्रकारचे गुन्हे करणार नाहीत.
परंतु या प्रकरणांची दुसरी बाजू म्हणजे, याला केवळ पुरूषच नव्हे तर स्त्रियाही काही प्रमाणात जबाबदार आहेत. प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे वागण्याचे, कुठेही जाण्याचे, हवे तसे कपडे घालण्याचे स्वातंत्र्य आहे. परंतु सर्वच नाही तरी काही महिला ज्याप्रकारे कपडे घालतात, त्यामुळे पुरूष त्याकडे आकर्षित होऊनही काही प्रमाणात असे प्रकार घडतात. त्यामुळे घराबाहेर पडताना महिलांनी आपण घातलेले कपडे व्यवस्थित आहेत का, याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. यामुळे आपल्या स्वातंत्र्यावर गदा मुळीच येत नाही, तर यामुळे आपलाच फायदा होऊ शकतो. केवळ कपड्यांमुळेच असे प्रकार घडतात, असेही माझे म्हणणे नाही. उलट साडी परिधान केलेल्या महिलांवर देखील अत्याचार होतात. त्यामुळे या सर्व प्रकारांपासून वाचण्यासाठी महिलांना स्वतःचे संरक्षण स्वतः करता आले पाहिजे. ही आताची गरज बनली आहे. त्यासाठी महिलांनी घराबाहेर पडताना आपल्या बॅगेत आपल्या सुरक्षेसाठी काही वस्तू जवळ बाळगणे आवश्यक आहे. उदा. एखादे धारदार हत्यार, मिरचीपूड, स्प्रे इ. अशाप्रकारे आपली सुरक्षा आपणच केली तर असे प्रकार घडणे आपोआपच कमी होईल, असे मला वाटते.
मिनल माळी

No comments:
Post a Comment